पुणे जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण कमी होण्याचे नावचं नाही; गुरुवारी दिवसभरातील आकडेवारी पहा

सकाळ वृत्तसेवा
Friday, 11 September 2020

पुणे जिल्ह्यात गुरुवारी दिवसभरात तब्बल ४ हजार ९३५  नवे कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. यामुळे आज सलग दुसऱ्या दिवशी पावणेपाच हजारांहून अधिक रुग्ण नोंदले गेले आहेत. यामध्ये पुणे शहरातील १ हजार ९१६ जण आहेत. दरम्यान, जिल्हा परिषद कार्यक्षेत्रातील रुग्णांचा एक हजारांचा आकडा सलग दुसऱ्यांदा पार झाला आहे.

पुणे - पुणे जिल्ह्यात गुरुवारी दिवसभरात तब्बल ४ हजार ९३५  नवे कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. यामुळे आज सलग दुसऱ्या दिवशी पावणेपाच हजारांहून अधिक रुग्ण नोंदले गेले आहेत. यामध्ये पुणे शहरातील १ हजार ९१६ जण आहेत. दरम्यान, जिल्हा परिषद कार्यक्षेत्रातील रुग्णांचा एक हजारांचा आकडा सलग दुसऱ्यांदा पार झाला आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

आजच्या एकूण रुग्णांमध्ये पुणे शहरातील सर्वाधिक रुग्णांबरोबरच पिंपरी-चिंचवडमध्ये १ हजार २१९, जिल्हा परिषद कार्यक्षेत्रात १ हजार २९७, नगरपालिका क्षेत्रात ३६८ आणि कॅंटोन्मेंट बोर्डाच्या कार्यक्षेत्रात १३५ नवे रुग्ण सापडले आहेत.

आज ८७ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मृत्यू झालेल्या एकूण रुग्णांमध्ये पुणे शहरातील सर्वाधिक ४३ रुग्ण आहेत. पिंपरी चिंचवडमधील १८ , जिल्हा परिषद क्षेत्रातील १७, नगरपालिका क्षेत्रातील ९ जण आहेत. आज कॅंटोन्मेंट बोर्डाच्या कार्यक्षेत्रात एकाही  रुग्णाचा मृत्यू झाला नाही. रुग्ण आणि रुग्णांच्या मृत्यूंची संख्या ही काल (ता. ९) रात्री ९ वाजल्यापासून आज (ता. १०) रात्री नऊ वाजेपर्यंतची आहे.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

दरम्यान, आज दिवसभरात ३ हजार २०३ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. यामध्ये पुणे शहरातील १ हजार ८३८, पिंपरी चिंचवडमधील ५५७, जिल्हा परिषद कार्यक्षेत्रातील ५१९, नगरपालिका क्षेत्रातील २५१ आणि कॅंटोन्मेंट बोर्डातील ३८ जण आहेत. यामुळे कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांची संख्या १ लाख ६६ हजार २७४ झाली आहे. याशिवाय आतापर्यंत  ४ हजार ८८१ रेरुग्णांचा मृत्यू झाला आहे. मृत्यू झालेल्यांमध्ये पुणे जिल्ह्याबाहेरील 
१६२ रूग्णांचा समावेश आहे.

Edited By - Prashant Patil


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: no shortage of corona patients in Pune district See statistics day Thursday