'मंदिर नाही तर 2019 मध्ये मतं नाही'

pune.jpg
pune.jpg

पुणे : 'मंदिर नाही तर मतं नाही' कायदा तयार करुन 2019 पूर्वी अयोध्येत राम मंदिर बांधा' अशा आशयाची पोस्टर्स पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना उद्देशून लिहिली आहेत. ही पोस्टर्स शहरातील विविध भागांत लावण्यात आली आहेत.

शिवाजीनगर सत्र न्यायालयाच्या मुख्य प्रवेशद्वाराबाहेर ही पोस्टर्स लावण्यात आली आहेत. तसेच जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील बस थांबा, शनिवारवाडा परिसरातील मुख्य रस्त्यावरील इमारतींवरही ही पोस्टर्स लावण्यात आली आहेत. ''कोणतीही व्यक्ती, संघटनेच्या नावाचा उल्लेख यामध्ये करण्यात आलेला नाही. या पोस्टर्सवर पोलिसांचे लक्ष असून, याबाबत चौकशी करण्यात येईल'' , असे वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले.  

दरम्यान, राम मंदिराचे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे, अशी पोस्टर्स लावणे हा सर्वोच्च न्यायालयाचा अवमान आहे. न्यायालयाच्या भिंतींवर परवानगीशिवाय कोणत्याच जाहिराती, पोस्टर्स लावायला मनाई आहे. महाराष्ट्र मालमत्ता विद्रूपीकरण कायद्याअतंर्गत हा दखलपात्र गुन्हा असून, पोलिसांनी आणि मनपा प्रशासनाने याची गंभीर दखल घेऊन कारवाई करायला हवी, असे अॅड बाळासाहेब खोपडे यांनी सांगितले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com