पिपंरी चिंचवड शहरात उद्या पाणीपुरवठा नाही

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 29 जानेवारी 2020

पिंपरी : पवना नदीवरील रावेत येथील अशुद्ध जलउपसा केंद्रातील विद्युत विषयक देखभाल-दुरुस्ती, निगडी-प्राधिकरण पेठ क्रमांक 23 मधील जलशुद्धीकरण केंद्रातील विद्युत व पाणीपुरवठा विषयक नियमित देखभाल-दुरुस्ती आणि शहरातील पाणी वितरण व्यवस्थेतील दुरुस्तीची कामे गुरुवारी (ता. 30) केली जाणार आहेत. त्यासाठी शहरातील पाणीपुरवठा यंत्रणा बंद ठेवली जाणार आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

केवळ, गुरुवारी सकाळचाच पाणीपुरवठा केला जाईल. सायंकाळचा पाणीपुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे. तसेच, शुक्रवारी (ता. 31) सकाळचा पाणीपुरवठा विस्कळित होण्याची शक्‍यता आहे. त्यामुळे नागरिकांनी दोन दिवस पुरेल इतका पुरेसा पाणीसाठा करून ठेवावा व उपलब्ध पाणी काटकसरीने वापरावे, असे आवाहन महापालिका पाणीपुरवठा विभागाचे सह शहर अभियंता मकरंद निकम यांनी केले आहे.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: no water supply in Pimpri chinchwad today evening