Noise Pollution Peaks Blaring Campaign
sakal
पुणे - पुणे शहराला ‘विद्येचे माहेरघर’ म्हणून जगभरात ओळखले जाते. त्याच पुण्यात आज निवडणुकीच्या नावाखाली विद्यार्थ्यांच्या अभ्यासाचा बळी दिला जात आहे. प्रचारासाठी ऑटो-रिक्षांवर लावलेले कर्कश भोंगे आणि गल्लोगल्ली सुरू असलेला घोषणांचा मारा, यामुळे शहरातील अभ्यासिकेत बसून भविष्याची स्वप्ने रंगविणाऱ्या विद्यार्थ्यांची एकाग्रता भंग होत असल्याने विद्यार्थ्यांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे.