
सोमेश्वरनगर - केंद्रसरकारने सी हेवी इथेनॉलच्या दरात प्रतिलिटर १ रूपये ६९ पैसे इतकी वाढ करण्याचा निर्णय आज घेतला. मात्र ज्यूसपासून इथेनॉल आणि बी हेवी इथेनॉलच्या दरात सलग दुसऱ्या वर्षी कुठलीही वाढ केली गेली नाही. यामुळे गेली दोन वर्ष इथेनॉल दरवाढीच्या प्रतिक्षेत असेलल्या साखर कारखान्यांच्या तोंडाला अक्षरशः पाने पुसली गेली आहेत.