

Pune Municipal Corporation
sakal
पुणे - अर्जासोबत धर्मादाय आयुक्तांकडील प्रमाणपत्र सादर करू शकले नाहीत म्हणून भाजपच्या स्वीकृत सदस्यपदासाठीचे दोन उमेदवारांचे अर्ज बाद झाले. त्यामुळे महापालिकेच्या मुख्यसभेत बुधवारी (ता. १८) दहाऐवजी आठ सदस्यांची स्वीकृत नगरसेवकपदी निवड करण्यात आली. जयप्रकाश पुरोहित आणि प्रियांका शेंडगे असे अर्ज बाद झालेल्या भाजपच्या सदस्यांची नावे आहेत.