पावसामुळे दिल्लीसह उत्तर भारताचा घसरला पारा
पावसामुळे दिल्लीसह उत्तर भारताचा घसरला पारा
सकाळ न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली, ता. २३ ः दिल्लीसह उत्तर भारतातील अनेक राज्यांत पावसाने लावलेल्या हजेरीमुळे पारा कमी झाला आहे. जोरदार वाऱ्यासोबत पडलेल्या पावसामुळे राष्ट्रीय राजधानी क्षेत्रातील जनजीवन शुक्रवारी सकाळी विस्कळित झाले. हवामान खात्याने पुढील काही दिवस हलक्या पावसाची शक्यता वर्तवली असून यामुळे तापमान कमी होण्याचा अंदाजही व्यक्त केला आहे.
गुरुवार (ता. २२) हा दिवस मागील सात वर्षांतील जानेवारी महिन्यातला सर्वात उष्ण दिवस म्हणून नोंदवला गेला. दरम्यान, शुक्रवारी पावसाने दिल्लीसह गाझियाबाद, नोएडा, गुरुग्राम आणि फरिदाबाद शहरांत हजेरी लावली.
प्रदूषण कमी नाहीच
राष्ट्रीय राजधानी परिसरात बऱ्यापैकी पाऊस पडला असूनही प्रदूषणाचे प्रमाण कमी झालेले नाही. ‘‘राष्ट्रीय राजधानी क्षेत्रासह जम्मू-काश्मीर, लडाख, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, पंजाब आणि हरियाना या ठिकाणी पश्चिमी विक्षोभामुळे पाऊस पडू शकतो. तर राजस्थान, पंजाब आणि हरियानाच्या काही भागात मोठ्या प्रमाणात धुके राहू शकते,’’ असे हवामान खात्याने सांगितले आहे.
दरम्यान, जम्मू-काश्मीर आणि उत्तराखंडच्या अनेक भागात बर्फवृष्टीस सुरुवात झाली आहे. बर्फवृष्टीमुळे या भागात पर्यटकांची वर्दळ वाढली आहे. यामुळे उत्तर भारतातील थंडीत वाढ होण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. हिमाचल प्रदेशातील सिमला येथे शुक्रवारी यंदाच्या हंगामात पहिल्यांदाच बर्फ पडला. दरम्यान, मोठ्या प्रमाणात बर्फ पडल्याने दिल्लीहून काश्मीरला जाणाऱ्या २४ विमानांचे उड्डाण रद्द करण्यात आले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

