Vadgaon Sheri News : पाणी गळती नाही, ही तर बनवेगिरी; खराडी बाह्यवळण चौक, रस्त्यावर सोडलेले पाणी बिल्डरचे

खराडी बाह्यवळण चौकात पाणी गळतीमुळे पडलेल्या खड्ड्यांबद्दल 'दैनिक सकाळ'ने वृत्त प्रसिद्ध केल्यानंतर प्रशासन खडबडून जागे झाले.
Water released onto the road belongs to the builder

Water released onto the road belongs to the builder

sakal

Updated on: 

वडगाव शेरी - खराडी बाह्यवळण चौकात पाणी गळतीमुळे पडलेल्या खड्ड्यांबद्दल 'दैनिक सकाळ'ने वृत्त प्रसिद्ध केल्यानंतर प्रशासन खडबडून जागे झाले. पाण्याच्या गळतीचा स्त्रोत शोधण्याचा प्रयत्न केल्यानंतर एक धक्कादायक प्रकार समोर आला. शेजारील बांधकाम प्रकल्पांच्या तळघरातील पाणी रात्रीच्या अंधाराचा फायदा घेऊन गुपचूप महामार्गावर सोडले जात असल्याचे उघड झाले.

Loading content, please wait...