dilip walse patil
sakal
मंचर - 'मंत्रिमंडळात नसलो तरी मी राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) च्या कोअर कमिटीत आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार, प्रफुल्ल पटेल, छगन भुजबळ, सुनील तटकरे, हसन मुश्रीफ यांच्यासह पक्षाची धोरणनिश्चिती करणाऱ्या या समितीत माझा समावेश आहे. त्यामुळे कोणत्याही विकासकामाला अडथळा येत नाही. निधीचा स्रोत कायम आहे,' असे माजी सहकार मंत्री आमदार दिलीप वळसे पाटील सांगितले.