पुणे - कोणतीही पूर्वसूचना न देता राजाराम पूल अचानक बंद केल्याने नागरिकांना प्रचंड वाहतूक कोंडीत अडकून पडावे लागले. यावरून महापालिका प्रशासनावर टीका होत असताना, महापालिकेने हा पूल बंद करणाऱ्या ठेकेदाराला कारने दाखवा नोटीस बजावली आहे.
तीन दिवसात याचा खुलासा करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे परस्पर पूल बंद करून वाहतुकीचा खेळखंडोबा करणाऱ्या ठेकेदारावर महापालिका काय कारवाई करणार याकडे लक्ष लागले आहे.