पुणे - विद्यापीठ अनुदान आयोगाच्या (यूजीसी) रॅंगिगविरोधातील नियमावलीची अंमलबजावणी करण्याकडे देशातील ८९ शिक्षण संस्थांनी दुर्लक्ष केल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. विविध माध्यमांद्वारे प्रचार करून रॅंगिंगविरोधी यंत्रणा वाढविण्याचे आदेश आयोगाने देशातील सर्व शिक्षण संस्थांना दिले आहेत. मात्र आयोगाच्या रॅंगिंगविरोधी नियमावलीची अंमलबजावणी न करणाऱ्या या संस्थांना आयोगाने कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.