आळेफाटा पोलिस ठाण्याच्या
हद्दीतील ग्रामपंचायतींनी सूचना

आळेफाटा पोलिस ठाण्याच्या हद्दीतील ग्रामपंचायतींनी सूचना

आळेफाटा, ता. ३ ः आळेफाटा पोलिस ठाण्याच्या हद्दीच्या गावांमधील ग्रामपंचायतींनी मुदतबाह्य व अनधिकृत जाहिरातीचे फलक, नाम फलक, निवेश फलक, शुभेच्छा फलक, भित्ती पत्रके, तात्पुरत्या कमानी व जाहिरातीसाठी वापरला जाणाऱ्या इतर साधने तत्काळ काढावी, अशा सूचना पोलिस निरीक्षक सतीष होडगर यांनी ग्रामपंचायतींना दिल्या आहेत.

मुंबईमधील अनधिकृत होर्डिंग कोसळून अनेक निष्पापांचा जीव गेला होता. त्या अनुषंगाने आळेफाटा पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक सतीश होडगर यांनी सांगितले की, पोलिस ठाण्याच्या हद्दीच्या ग्रामपंचायत कार्यक्षेत्रात असणारे विविध सण, समारंभ, जयंती व धार्मिक कार्यक्रमांसाठी आपले स्तरावर परवानगी प्राप्त करून किंवा बीना परवानगीने ग्रामपंचायत कार्यक्षेत्रातील विविध भागांत जाहिरातीसाठी इतर साधनांचा वापर केला जातो. त्यांची मुदत संपून गेल्यानंतरही ते काढले जात नाहीत. त्यामुळे जीवितहानी होऊ नये. या अनुषंगाने ग्रामपंचायतीने आपल्या कार्यक्षेत्रात विशेष मोहीम राबवून त्यामध्ये निर्दशनास आलेल्या अनधिकृत फलकांबाबत महाराष्ट्र मालमत्तेच्या विरुपणास प्रतिबंध कारवाई करावी. तसेच नमुद कार्यवाहीची अंमलबजावणी न झाल्यास संबंधितांना जबाबदार धरण्यात येणार आहे. त्यामुळे विशेष पथक नेमून जाहिरातीसाठी वापरला जाणाऱ्या इतर साधने तत्काळ काढावी, त्यासाठी लागणारा आवश्यक तो पोलिस बंदोबस्त पुरविण्यात येईल.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com