पुणे : ..आता 'ब्रेक फेल' झालेल्या ट्रकने आठ जणांना उडविले | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

00accident_86_29.jpg

पुणे :  ब्रेक फेल झाल्यामुळे ट्रकने काही वाहनांना उडविल्याची घटना पुण्यातील नवले ब्रिज येथे घडली.  ट्रकचालकाचे नियंत्रण सुटल्यामुळे त्यामध्ये 8 जण जखमी झाले असून 3 जणांची प्रकृती चिंताजनक आहे. आज दुपारी अडीच ते तीन या वेळेत हा अपघात घडला. जघमींना नवले रुग्णालयात दाखल केले असून प्रकृती गंभीर असल्याचे समजते.

पुणे : ..आता 'ब्रेक फेल' झालेल्या ट्रकने आठ जणांना उडविले

पुणे :  ब्रेक फेल झाल्यामुळे ट्रकने काही वाहनांना उडविल्याची घटना पुण्यातील नवले ब्रिज येथे घडली.  ट्रकचालकाचे नियंत्रण सुटल्यामुळे त्यामध्ये 8 जण जखमी झाले असून 3 जणांची प्रकृती चिंताजनक आहे. आज दुपारी अडीच ते तीन या वेळेत हा अपघात घडला. जघमींना नवले रुग्णालयात दाखल केले असून प्रकृती गंभीर असल्याचे समजते.   

हे ट्रक नारळ घेवून मुंबईच्या दिशेने जाताना कात्रजच्या नवीन बोगदा दरम्यान ब्रेक फेल झाले. यानंतर नवले पुलावर भरधाव ट्रकने आठ जणांना उडवले. या अपघातात १ दुचाकी, १ आयशर, २ कार आणि २ रिक्षांना धडक दिल्यामुळे नुकसान झाले. हे ट्रक नारळ घेऊन मुंबईला जात होते. या अपघातामुळे नवले पूलकडे येणाऱ्या मार्गांवर भीषण वाहतूक कोंडी झाली