esakal | आता गृहप्रकल्पासाठीही ‘तारीख पे तारीख’

बोलून बातमी शोधा

वाल्हेकरवाडी - प्राधिकरणाच्या वतीने उभारण्यात येत असलेला गृहप्रकल्प.

दृष्टिक्षेपात प्रकल्प

  • प्रकल्पातील एकूण घरे - ७९२
  • वन-रूम किचन घरे - २७४ चौरस फूट (कार्पेट एरिया)
  • वन बीएचके घरे - ४७४ चौरस फूट (कार्पेट एरिया)

७३ कोटी रुपये - प्रकल्पासाठीचा एकूण खर्च
२० कोटी रुपये - ठेकेदाराला अदा केलेली रक्कम 
९० लाख रुपये - दंडापोटी वसूल

आता गृहप्रकल्पासाठीही ‘तारीख पे तारीख’

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

पिंपरी - प्राधिकरणाच्या वतीने वाल्हेकरवाडी येथे बांधण्यात येणाऱ्या गृहप्रकल्पाच्या कामाची मुदत संपूनही अद्याप केवळ ३० टक्केच काम पूर्ण झाले आहे. या प्रकल्पाला नोव्हेंबर २०२० पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. मात्र, कामाचा वेग पाहता नोव्हेंबरपर्यंत तरी हे काम पूर्ण होणार का, असा प्रश्‍न उपस्थित करण्यात येत आहे.

ताज्या बातम्यांसाठी करा ई-सकाळचे ऍप 

कामगारांना रास्त दरात घरे मिळावीत, यासाठी सरकारने प्राधिकरणाची स्थापना केली. त्याअंतर्गत ७ जानेवारी २०१६ ला वाल्हेकरवाडी गृहप्रकल्पास सुरुवात झाली. या प्रकल्पाची मुदत ४२ महिने होती. त्यानुसार जुलै २०१९ पर्यंत हे काम पूर्ण होणे अपेक्षित होते. मात्र, हे काम मुदतीत पूर्ण झालेले नाही. ठेकेदाराकडून वेळेत काम पूर्ण नसल्याचे दिसताच ऑक्‍टोबर २०१६ पासून ठेकेदाराला दंड आकारण्यास सुरुवात करण्यात आली.

ठेकेदाराला करारानुसार सुरुवातीला प्रतिदिन दोन हजार, त्यानंतर पाच हजार आणि त्यानंतर दहा हजार रुपये दंड आकारण्यात येत आहे. आत्तापर्यंत दंडापोटी ९० लाख रुपये ठेकेदाराकडून वसूल करण्यात आले आहेत. मात्र, तरीही ठेकेदाराकडून काम करण्याचे आश्‍वासन देण्यात आल्याने प्राधिकरणाच्या वतीने त्याच ठेकेदाराला मुदतवाढ देण्यात आली. मात्र, या मुदतवाढीनंतरही काम पूर्ण न झाल्यास या ठेकेदाराबाबत प्राधिकरण सभा निर्णय घेईल. ठेकेदाराकडून काम वेळेत पूर्ण करण्यात आले नाही. मात्र, त्याला कोणत्याही कारणामुळे प्रकल्पाचा खर्च वाढवून मिळणार नाही. 

'मी ब्राह्मण नसूनही मला...'; तेजश्री प्रधान म्हणते...

प्रकल्प वेळेत पूर्ण होऊ नये म्हणून काही राजकीय नेत्यांनीही हस्तक्षेप केल्याची चर्चा आहे. या राजकारण्यांनी त्यांना टक्केवारी मिळावी, त्यांच्याकडून प्रकल्पासाठीचा आवश्‍यक माल ठेकेदाराने त्यांच्याकडूनच घ्यावा, यासाठी ठेकेदारावर दबाव आणला. यासारख्या कारणांमुळेही प्रकल्प रखडल्याची चर्चा आहे. त्यामुळे अनेक दिवस काम बंद होते. मात्र, सध्यातरी काम सुरू आहे.

हायब्रिड धान्यात चमक आहे पण धमक नाही : बिजमाता राहिबाई 

लाभार्थीनिश्‍चितीसाठी स्वतंत्र सॉफ्टवेअर लवकरच तयार करण्यात येणार आहे. त्याद्वारे लाभार्थ्यांकडून ऑनलाइन पद्धतीने अर्ज मागविण्यात येतील. लॉटरीपद्धतीने लाभार्थी निश्‍चित करण्यात येणार आहेत. या घरांसाठी सरकारी नियमानुसार आरक्षण लागू राहील.
-  आशाराणी पाटील, उपमुख्य कार्यकारी अधिकारी, प्राधिकरण