आता जम्मू-काश्‍मीरचे सफरचंद मिळणार थेट पुण्यात

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 18 सप्टेंबर 2019

सरहद आणि जिल्हाधिकारी दोडा (जम्मू-काश्‍मीर) यांच्या संयुक्त विद्यमाने जम्मू-काश्‍मीरमधील शेतकऱ्यांच्या बागेतील ताजी सफरचंदे तेथील शेतकऱ्यांकडून थेट पुणेकरांसाठी उपलब्ध केली आहेत.
 

पुणे : सरहद आणि जिल्हाधिकारी दोडा (जम्मू-काश्‍मीर) यांच्या संयुक्त विद्यमाने जम्मू-काश्‍मीरमधील शेतकऱ्यांच्या बागेतील ताजी सफरचंदे तेथील शेतकऱ्यांकडून थेट पुणेकरांसाठी उपलब्ध केली आहेत.

21 व 22 सप्टेंबरला सकाळी 10 ते 5 या वेळेत 75 रुपये प्रतिकिलोने कात्रज येथील संस्थेच्या सरहद भवनमध्ये उपलब्ध करून देण्यात आली आहेत.

शेतकऱ्यांच्या बागेतून थेट पुणेकरांसाठी ही सफरचंदे उपलब्ध करण्यात आली असल्याने ती ताजी व बाजार भावापेक्षा स्वस्थ दरात मिळणार असल्याचे सरहद संस्थेकडून सांगण्यात आले आहे. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Now Jammu and Kashmir apples will be available directly in Pune