'तुरुंगात जाण्यासाठी परबांनी लवकर बॅग भरावी'

परबांविरोधात फौजदारी प्रक्रिया सुरू असून, त्यात परब किती खोटारडे मंत्री आहेत हे समोर आले आहे.
anil parab
anil parabesakal

पुणे : तुरुंगात जाण्याचा पुढील नंबर राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब (Anil Parab) यांचा असून, त्यांनी लवकर बॅग भरावी असा, सूचक आणि खोचक सल्ला भाजप नेते किरीट सोमय्या यांनी दिला आहे. किरीट सोमय्या यांनी आज पुण्यातील आयकर सदनला भेट दिली. त्यावेळी ते पत्रकारांशी बोलत होते. (Kirit Somaiya On Anil Parab )

anil parab
KKR vs PBKS Live : पंजाबसमोर उमेश यादवचा 'भांगडा'

अनिल परब यांच्याविरोधात फौजदारी प्रक्रिया सुरू झाली असून, त्यात अनिल परब किती खोटारडे आणि लबाड मंत्री आहेत हे समोर आले आहे. त्यामुळे आता तुरुंगात जाण्याचा पुढील क्रमांक अनिल परब यांचा आला आहे, असे सोमय्या म्हणाले. दरम्यान, दापोलीतील रिसॉर्ट (Dapoli Resort) संदर्भात आपला काहीही संबंध नसल्याचे सांगत मोदी सरकारने दापोली कोर्टात केस केली असून, त्यात सर्व पुरावे दिल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

anil parab
Fire in Forest : देशात तीन दिवसांत 16,840 आगीच्या घटना

हसन मुश्रीफांकडे 100 कोटींपेक्षा अधिक संपत्ती

हसन मुश्रीफ (Hassan Mushrif) परिवाराकडे शंभर कोटी पेक्षा जास्त बेनामी संपत्ती आहे, त्याची आज न्यायालयीन सुनावणी आहे. घोटाळेबाजांना ठाकरे सरकार पाठीशी घालतय. तसेच सोमय्या यांनी अनिल परब व सरकारच्या विरोधात हल्लाबोल केला. हसन मुश्रीफ यांच्या वर फौजदारी कारवाई मागणी केली. तसेच त्यांनी आपल्याकडे अनेक पुरावे पूरावे असल्याचा दावा केला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com