आता राज्यातील सर्व दूध संघांचा दर समान

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 31 ऑगस्ट 2019

राज्यातील शेतकऱ्यांकडून खरेदी करण्यात येणाऱ्या गाईच्या दुधाचा प्रतिलिटर दर सर्व दूध संचांनी समान ठेवण्याचा निर्णय राज्य सहकारी व खासगी दुध व्यवसायिक व प्रक्रिया कल्याणकारी संघाच्या शनिवारी झालेल्या (ता. ३१) बैठकीत घेण्यात आला.
यामुळे यापुढे गाईच्या दुधाचा खरेदी दर एकसमान राहणार आहे.

पुणे : राज्यातील शेतकऱ्यांकडून खरेदी करण्यात येणाऱ्या गाईच्या दुधाचा प्रतिलिटर दर सर्व दूध संचांनी समान ठेवण्याचा निर्णय राज्य सहकारी व खासगी दूध व्यवसायिक व प्रक्रिया कल्याणकारी संघाच्या शनिवारी झालेल्या (ता. ३१) बैठकीत घेण्यात आला.

यामुळे यापुढे गाईच्या दुधाचा खरेदी दर एकसमान राहणार आहे. यानुसार शेतकऱ्यांना आता प्रतिलिटर २८ रुपये दर देण्यात येणार आहे. नवीन दराची अंमलबजावणी येत्या रविवारपासुन (१ सप्टेंबर) केली जाणार आहे.
 

म्हशीचा दूध खरेदी दर पुर्वीप्रमाणेच कायम राहणार आहे. दरम्यान, खरेदी दरात वाढ झाली असली तरी, विक्री दरात वाढ केली जाणार नसल्याचे या संघाचे अध्यक्ष गोपाळ म्हस्के आणि सचिव प्रकाश कुतवळ यांनी सांगितले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Now the prices of all milk unions in the state are equal