Sinhagad Ghat : सिंहगडावर जाणाऱ्या पर्यटकांसह वाहनांसाठी महत्त्वाची बातमी; वन विभागानं घेतला 'हा' निर्णय, काय आहे जाणून घ्या..

सिंहगड घाटातील वाहतुकीचे नियोजन घेरा सिंहगड वनसंरक्षण समिती (Sinhagad Forest Conservation Committee) करते.
Sinhagad Ghat
Sinhagad Ghatesakal
Summary

पर्यटकांची संख्या आणि घाटातील वाहनांच्या संख्येचे प्रमाणात तसे वेळापत्रक तयार करणार आहे.

खडकवासला : सिंहगडावर पर्यटकांची (Tourists) वाढती गर्दी पाहता, सुट्टीच्या दिवशी घाटात शेवटच्या टप्प्यातील वाहतूक कोंडी टाळण्यासाठी वन विभाग (Forest Department) गडावर सोडण्यात येणारी वाहतूक टप्प्याटप्प्याने सोडण्याचे नियोजन करीत आहे. याबाबत वन विभागाने घेरा सिंहगड वन व्यवस्थापन समितीला सूचना केल्या आहेत.

Sinhagad Ghat
Konkan Tourism : अणुस्कुरा घाटात निसर्गानं पांघरला हिरवा शालू; पावसाळ्यात घाट घालतोय पर्यटकांना साद

सिंहगड घाटातील (Sinhagad Ghat) शेवटच्या तीन किलोमीटरमध्ये रविवारी (ता. १६) नियोजन फसल्याने सुमारे चार तासाहून अधिक काळ गड वाहतुकीसाठी बंद होता. तसेच सोमवारी सुट्टी असल्याने गर्दी झाली होती. परिणामी, वाहतूक कोंडी झाली होती. सिंहगड घाटातील वाहतुकीचे नियोजन घेरा सिंहगड वनसंरक्षण समिती (Sinhagad Forest Conservation Committee) करते. समितीकडून त्याबाबत वेळेत योग्य निर्णय न घेतल्याने अभूतपूर्व वाहतूक कोंडी झाली होती.

याबाबत ‘सकाळ’ने वाहतूक कोंडीच्या व जिल्हा प्रशासनाने याबाबत दखल घ्यावी, अशा सूचना असणारी बातमी सोमवारच्या अंकात प्रसिद्ध केली होती. यामुळे वन विभाग खडबडून जागे झाले. त्यांनी सुरळीत वाहतुकीसाठी घाटातील वाहतुकीच्या व्यवस्थापनात बदल करण्याच्या सूचना वन समितीला दिल्या आहेत. रविवारी वाहतूक कोंडीमुळे पर्यटकांचे हाल झाले. जास्तीत-जास्त पर्यटकांना गडावर जाता यावे. यासाठी वाहतूक कोंडी टाळून सिंहगडावर जाता येईल.

Sinhagad Ghat
Amboli Ghat : आंबोलीतला 'हा' धबधबा झाला प्रवाहित; घाटात 200 मिलीमीटरपेक्षा जास्त पाऊस, हिरण्यकेशीला मोठ्या प्रमाणात पाणी

यासाठी समिती नियोजन करीत आहे. सिंहगडावर जाणाऱ्या आणि येणाऱ्या वाहनांसाठी वेळापत्रक तयार करण्यात येईल. गडावर जाणारी वाहने कोंढणपूर नाका येथे वाहने थांबविणार, त्याचवेळी गडावरील वाहन तळावरून वाहने खाली येतील. कोंढणपूर नाका येथून वाहने गडावर सोडल्यावर वाहन तळावरून एक ही वाहन खाली येणार नाही, असा प्रयोग करण्यात येणार आहे, अशा सूचनाही वन विभागाने वन समितीला केल्या आहेत.

पर्यटकांची संख्या आणि घाटातील वाहनांच्या संख्येचे प्रमाणात तसे वेळापत्रक तयार करणार आहे. या संदर्भात तातडीने त्याची अंमलबजावणी या शनिवारपासून करण्यात येणार आहे. त्यासाठी वन व्यवस्थापन समितीचे स्तरावर त्याची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्यासाठी संबंधितास आवश्यक ते आदेश आणि सूचना देखील केल्या आहेत.

-प्रदीप संकपाळ वनपरिक्षेत्र अधिकारी, भांबुर्डा

Sinhagad Ghat
हाय रिस्क प्रेग्नन्सी म्हणजे नेमकं काय? गरोदर स्त्रीयांवर कोणता होतो परिणाम? जाणून घ्या महत्त्वाची माहिती

आणखी उपाययोजना

  • सुरक्षारक्षकांना गणवेश, रेनकोट देणार

  • वाहनतळावर पांढरे पट्टे मारणे

  • वाहनतळाची दुरवस्था दूर करणार

  • वन आणि वाहतूक व्यवस्थापनाचे प्रशिक्षण

  • प्रवासी वाहनांबाबत पोलिस, परिवहन विभागाची मदत घेणार

  • धोकादायक, भरधाव वेगाने वाहने चालविणाऱ्यांवर कारवाई होणार

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com