Vidhan Sabha 2019 : विकासाची स्वप्न आता प्रत्यक्षात उतरविण्याची वेेळ आलीये : चेतन तुपे

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 9 ऑक्टोबर 2019

हडपसर : ''हडपसर विधानसभा मतदारसंघात वाढीस लागलेल्या भ्रष्टाचारी, उपद्रवी प्रवृत्तीचा बीमोड करून सुशासन आणण्याचा संकल्प इथल्या जनतेने केला आहे. आजच्या या प्रचार फेरीस मिळालेला अभूतपूर्व प्रतिसाद बघता जनतेला बदल निश्चितच हवा आहे आणि तो पर्याय शरद पवारांची राष्ट्रवादीच देऊ शकते, हे जनतेला पटले आहे,'' असे प्रतिपादन महाआघाडीचे उमेदवार चेतन तुपे यांनी केले. 

हडपसर : ''हडपसर विधानसभा मतदारसंघात वाढीस लागलेल्या भ्रष्टाचारी, उपद्रवी प्रवृत्तीचा बीमोड करून सुशासन आणण्याचा संकल्प इथल्या जनतेने केला आहे. आजच्या या प्रचार फेरीस मिळालेला अभूतपूर्व प्रतिसाद बघता जनतेला बदल निश्चितच हवा आहे आणि तो पर्याय शरद पवारांची राष्ट्रवादीच देऊ शकते, हे जनतेला पटले आहे. माझ्यावर प्रेम करणाऱ्या, हक्काने येऊन माझ्यापर्यंत आपली व्यथा मांडणाऱ्या माझ्या माणसांचा मी ऋणी आहे. आत्तापर्यंत त्यांनी विकासाची स्वप्न पाहिली पण, आता ती प्रत्यक्षात उतरविण्याची वेळ आली आहे. ती पूर्ण करण्यासाठी मतदारांनी सहकार्य करावे.''' असे प्रतिपादन महाआघाडीचे उमेदवार चेतन तुपे यांनी केले. 

कोंढव्यात जोरदार प्रर्दशन करीत पदयात्रा काढली, याप्रसंगी तुपे बोलत होते. 
कोंढवा भागातील भाग्योदय नगर, नवाजीश चौक, मिठानगर, आशीर्वाद चौक, ज्योती चौक, शिवनेरी नगर गल्ली, आयडियल बेकरी चौक, ब्रह्मा कौंटी, कौसर बाग, पारगे चौक भागात तुपे यांनी जनतेशी संपर्क साधत गाठीभेटी केल्या.

तुपे पुढे म्हणाले,  भाजपाचे आमदार योगेश टिळेकर यांनी केवळ पोकळ गप्पा, कागदावरच विकास दाखवून जनतेची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे गेल्या पाच वर्षापासून हडपसर मतदार संघाचा विकास खुंटला आहे. टिळेकर यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप आहेत. त्यामुळे जनता त्यांना या विधानसभेच्या निवडणूकीत खाली खेचेल.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Now is the time to fulfill the dream of development said chetan tupe