esakal | बारामतीकरांना आज किंचित दिलासा! रुग्णसंख्या घटली
sakal

बोलून बातमी शोधा

The number of corona patients in Baramati slightly come down today

बरे झालेल्या रुग्णांची संख्याही झपाट्याने वाढत असून लक्षणे नसलेले रुग्ण अधिक असल्याने प्रशासनाला काहीसा दिलासा मिळत आहे. लॉकडाऊनचा परिणाम दिसण्यास काही काळ लागेल असे प्रशासनाचे म्हणणे होते. काल झालेल्या तपासण्यांपैकी कमी रुग्ण पॉझिटीव्ह आढळल्याने हळुहळू रुग्णसंख्या आटोक्यात येत असल्याचे जाणवू लागले आहे. 

बारामतीकरांना आज किंचित दिलासा! रुग्णसंख्या घटली

sakal_logo
By
मिलिंद संगई, बारामती

बारामती : शहरातील कोरोनाग्रस्तांच्या रुग्णांचा आकडा आज किंचित कमी झाला. कालचे प्रतिक्षेतील व काल केलेल्या तपासण्यांपैकी 81 जण पॉझिटीव्ह आले आहेत. कालच्या प्रतिक्षेतील 119 पैकी 13 रुग्ण तर कालच्या आरटीपीसीआर व रॅपिड अँटीजेन अशा 386 तपासण्यांपैकी 68 जण पॉझिटीव्ह आले आहेत. आज तुलनेने कोरोनाग्रस्तांचे प्रमाण कमी असल्याने किंचीत दिलासा मिळाला आहे. मात्र अजूनही 56 रुग्णांचे अहवाल प्रतिक्षेत आहेत. गेले काही दिवस रुग्ण सापडण्याचे प्रमाण 30 टक्के होते. आज हे प्रमाण 30 टक्क्यांवरुन 20 टक्क्यांवर आले आहे. 

बरे झालेल्या रुग्णांची संख्याही झपाट्याने वाढत असून लक्षणे नसलेले रुग्ण अधिक असल्याने प्रशासनाला काहीसा दिलासा मिळत आहे. लॉकडाऊनचा परिणाम दिसण्यास काही काळ लागेल असे प्रशासनाचे म्हणणे होते. काल झालेल्या तपासण्यांपैकी कमी रुग्ण पॉझिटीव्ह आढळल्याने हळुहळू रुग्णसंख्या आटोक्यात येत असल्याचे जाणवू लागले आहे. 

निगेटीव्ह रुग्णावर येतेय विलगीकरणाची वेळ.....
बारामतीतील काही कुटुंबामध्ये एक सदस्य सोडून इतर सगळे पॉझिटीव्ह असे चित्र असल्याने जो सदस्य निगेटीव्ह आहे त्यालाच इतरत्र पाठवून देण्याची वेळ या कुटुंबावर आली आहे. सगळे पॉझिटीव्ह रुग्ण एकत्र राहू शकतात पण निगेटीव्ह असलेल्याला लागण होऊ नये या साठी त्यालाच विलगीकरण करण्याची वेळ आली आहे. दरम्यान ज्यांची टेस्ट पॉझिटीव्ह आली आहे मात्र ज्यांना अजिबात लक्षणे नाहीत त्यांनी दवाखान्यात दाखल होण्याची घाई करु नये, घरातच त्यांनी विलगीकरणात राहावे, जेणेकरुन लक्षणे असलेल्या रुग्णांवर प्रभावी उपचार करणे शक्य होईल, असे आवाहन तालुका आरोग्य अधिकारी डॉ. मनोज खोमणे यांनी केले आहे. 

 दृष्टीक्षेपात बारामतीचा आढावा
•    आजपर्यंतची एकूण रुग्ण संख्या- 1970
•    उपचाराखाली असलेले रुग्ण- 1137
•    आजपर्यंत कोरोनाने मृत्यूमुखी पडलेले रुग्ण- 54
•    पॉझिटीव्ह असलेले मात्र लक्षणे नसलेले रुग्ण- 583
•    सौम्य लक्षणे असलेले रुग्ण- 394
•    मध्यम लक्षणे असलेले- 73
•    ऑक्सिजनवर असलेले रुग्ण- 45
•    व्हेंटीलेटरवर असलेले रुग्ण- 10
•    बरे झालेले रुग्ण- 847

दाखल रुग्णांची दवाखानानिहाय स्थिती खालील प्रमाणे
•    रुई ग्रामीण रुग्णालय- 27
•    सिल्व्हर ज्युबिली रुग्णालय- 92
•    शासकीय वैद्यकीय महाविद्यालय- 234
•    नटराज नाट्य मंडळ कोविड सेंटर- 100
•    नटराजचे प्रेरणा कोविड सेंटर- 37
•    बारामती हॉस्पिटल- 35
•    विविध खाजगी रुग्णालय- 81
•    घरी विलगीकरणातील रुग्ण संख्या- 524
•    पुणे येथे उपचार घेत असलेले रुग्ण-7