
भोर - तालुक्यात बुधवारी (ता. १५) प्रथमच एकाच दिवशी कोरोनाचे १९ रुग्ण आढळल्याने उपचार घेत असलेल्या कोरोनाग्रस्तांची संख्या ५३ झाली आहे. यामुळे प्रशासनाच्या डोकेदुखीत वाढ झाली आहे. प्रशासनाने मंगळवारी (ता.१४) भोर शहरासहीत शिंदेवाडी, पिसावरे व संगमनेर या गावांमधील २९ जणांचे स्वॅब कोरोनाच्या चाचणीसाठी पाठविले त्यापैकी १६ जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले आहेत.
- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा
बुधवारी रात्री उशीरा याचा अहवाल प्रशासनास मिळाला. याशिवाय पोंबर्डी, केळवडे व देगाव येथील प्रत्येकी एक रुग्ण पॉझिटीव्ह आला आहे. या तिन्ही रुग्णांनी कोरोनाची खासगी चाचणी केली होती. त्यामुळे आज बुधवारी कोरोनाग्रस्तांची संख्या १९ झाली आहे. प्रशासनाने कोरोनाच्या आजारातून मुक्त झालेल्या ११ जणांना घरी सोडले आहे. तालुक्यातील कोरोनाचे ५३ रुग्ण पुणे व भोर येथे उपचार घेत आहेत. तालुक्यात आजपर्यंत एकही रुग्ण कोरोनामुळे दगावलेला नाही. ही जरी चांगली गोष्ट आहे.
परंतु नागरिकांनी मात्र यापुढे कोरोनाच्या आजारास गांभिर्याने न घेतल्यास कोरोनामुळे मृत्यु होणे हे नाकारता येणार नाही. त्यामुळे नागरिकांनी शासनाच्या नियमांचे पालन करून कोरोनाचा प्रसार थांबविण्यासाठी प्रशासनास सहकार्य करावे आणि समाजाच्या प्रती आपली असलेली सद्मभावना दाखवावी. यामुळे आपल्या कुटुंबासमवेत भोर तालुक्यातील नागरिकांचेही कोरोनापासून रक्षण करावे असे आवाहन गटविकास अधिकारी विशाल तनपुरे यांनी केले आहे. दरम्यान तहसीलदार अजित पाटील यांनी मंगळवारी (ता. १४) कोविड केअर सेंटरमधून दोन रुग्ण पळून गेलेल्या घटनेची चौकशी करण्यासाठी कोविड केअर सेंटरला भेट दिली. तेथील रुग्णांशी संवाद साधून बंदोबस्तासाठी असलेले पोलिस व कर्मचारी यांना उत्तम कार्यपध्दती राबविण्याच्या सूचना दिल्या.
Edited By - Prashant Patil
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.