esakal | इंदापूरकरांनो, आता कोरोनाबाबत सावधान, कारण... 
sakal

बोलून बातमी शोधा

इंदापूरकरांनो, आता कोरोनाबाबत सावधान, कारण... 

इंदापूर तालुक्यामध्ये तीन दिवसांमध्ये कोरोना रुग्णाच्या संख्या १४० वर पोहचली असून, दिवाळीच्या तोंडावर तालुक्यामध्ये कोरोनाचा संसर्ग वाढण्याचा धोका निर्माण झाला आहे.

इंदापूरकरांनो, आता कोरोनाबाबत सावधान, कारण... 

sakal_logo
By
राजकुमार थोरात

वालचंदनगर : इंदापूर तालुक्यामध्ये तीन दिवसांमध्ये कोरोना रुग्णसंख्या १४० वर पोहचली असून, दिवाळीच्या तोंडावर तालुक्यामध्ये कोरोनाचा संसर्ग वाढण्याचा धोका निर्माण झाला आहे. समाजामध्ये बेफिकीरपणे वागणाऱ्या नागरिकांनी  आत्ताच सावध होवून योग्य काळजी घेण्याची गरज आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

इंदापूर तालुक्यामध्ये गेल्या पंधरा-वीस दिवसांपासून कोरोना रुग्णाच्या संख्येमध्ये घट झाली होती. मात्र गेल्या दोन दिवसांपासून अचानक कोरोना रुग्णाच्या संख्येमध्ये वाढ झाली. बुधवार (ता. २८) रोजी इंदापूर तालुक्यामध्ये एकाच दिवसामध्ये नव्याने  ६० कोरोना रुग्णांची नोंद झाली. तर गुरुवारी (ता.२९) रोजी ४१ रुग्ण आढळले. आज शुक्रवार (ता.३०) रोजी ३९ कोरोना रुग्ण आढळले आहेत. दोन दिवसांमध्ये तीन कोरोना रुग्णांचा मृत्यू झाल्याची घटना घडली. आजपर्यंत तालुक्यामध्ये कोरोनाचे ३३३१ रुग्ण आढळले असून २९१४ रुग्णांनी कोरोनावरत मात केली असून १२१ रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

इंदापूर तालुक्यातून कोरोना हद्दपार झाल्यासारखे तालुक्यातील बहुतांश नागरिक वागत आहेत. दिवाळीच्या तोंडावर बाजारापेठामध्ये गर्दी वाढू लागली आहे. भाजीपाला, कपडे व किराणा खरेदी करण्यासाठी नागरिक गर्दी करु लागले आहेत. मात्र खरेदी करताना काळजी घेण्यास टाळाटाळ करीत आहेत. अनेक नागरिकांनी तर तोंडाला मास्क लावायचे सोडून दिले आहे. जागोजागी गर्दी होत असल्याने सामाजिक अंतर ठेवण्याचा फज्जा उडाला आहे. अनेकांना कोरोना संसर्ग संपला असल्यासारखे वाटू लागल्यामुळे कोरोनाचा धोका वाढत चालला आहे.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

मास्क वापरण्याचे आवाहन- यासंदर्भात तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.प्रशांत महाजन यांनी सांगितले की, कोरोनाचा धोका टळला नसून नागरिकांनी स्वत:ची व कुंटूबाची काळजी घेण्याची गरज आहे. नागरिकांनी अत्याआवश्‍यक सेवेसाठीच घराबाहेर पडून गर्दी टाळावी. तसेच मास्कचा नियमित वापर करणे गरजेचे असून  सामाजिक अंतराचे पालन करावे.नियमित हात धुवावेत. तसेच नाक, तोंड व डोळ्याला सतत हात लावण्याचे टाळण्याचे आवाहन केले.

(संपादन : सागर डी. शेलार)

loading image