बापरे, मंचर शहरावरील मोठे संकट टळले

बापरे, मंचर शहरावरील मोठे संकट टळले
Updated on

मंचर : मंचर शहरात धारावी पॅटर्नप्रमाणे सहा हजार कुटुंबांपर्यंत जाऊन जम्बो सर्वेक्षण बुधवारी (ता. ९) व गुरुवारी(ता.१०) करण्यात आले. 187 पॉझिटिव्ह आलेले रुग्ण निष्पन्न झाले नसते तर, त्यांच्या संसर्गामुळे येत्या पंधरा दिवसात 935 नवीन पॉझिटिव्ह रुग्णांची भर पडली असती. सर्वेक्षणामुळे पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या रोखण्यास मदत होणार असून शहरावरील कोरोनाचे मोठे संकट टळले आहे.  

आंबेगाव तालुक्याची मंचर ही  मुख्य बाजारपेठ असल्यामुळे तालुक्यातील  104  गावांचा व शेजारी असलेल्या खेड,जुन्नर व शिरूर तालुक्यातील ५० गावांचा दैनंदिन संपर्क व्यापार व शेतीमालाच्या निमित्ताने मंचर बाजारपेठेशी  येतो.वाढत्या पॉझिटिव्ह रुग्णांच्या संख्येमुळे प्रशासनही हतबल झाले होते. प्रशासनाने हाती घेतलेल्या सर्वेक्षण उपक्रमाचे सर्वत्र स्वागत होत आहे.

आंबेगाव तालुक्यात गुरुवारी  30 रुग्ण पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. तालुक्यातील पॉझिटिव रुग्णांची संख्या एक हजार 734 पर्यंत गेली आहे.नागरिकांनी सोशल डीस्टन्स व प्रमाणित मास्क वापरावेत.”असे आंबेगाव तालुका पंचायत समितीचे सभापती संजय गवारी यांनी सांगितले.

मंचर उपजिल्हा रुग्णालय व घोडेगाव ग्रामीण रुग्णालयात रॅपिड एंटीजन टेस्ट व अवसरी खुर्द येथील शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयात स्वॅप घेतले जातात. अशी माहिती आरोग्य अधिकारी डॉ.सुरेश ढेकळे यांनी दिली.

अवसरी खुर्द,वडगाव काशिंबेग,निघोटवाडी आदी गावांमध्येही लवकरच सर्वेक्षण होणार आहे.असे गटविकास अधिकारी जालिंदर पठारे यांनी सांगितले. ते म्हणाले “ नागरिकांनी लक्षण दिसल्याबरोबर उपचार केंद्रात तपासणी करून घ्यावी प्राथमिक अवस्थेत निदान झाल्यास रुग्ण लवकर बरा होऊ शकतो असा अनेकांचा अनुभव आहे. 

मंचर शहरात लहान मोठे दोन हजार व्यावसाईक आहेत.पण कोरोना संसर्ग वाढत चालल्यामुळे प्रशासनाच्या आदेशाशिवाय गावकर्यांनी व व्यापार्यांनी  उत्सुर्तपणे लॉकडाऊन मोहीम राबविली होती. घेऊन सर्वेक्षणामुळे  पॉझिटिव्ह येणाऱ्या रुग्णांची संख्या रोखता येईल.”असे उद्योजक अजय घुले यांनी सांगितले.

“मंचर शहरात गेले दोन दिवस  ३१ हजार जणांची तपासणी करण्यात आली. एक हजार 165 संशयितांपैकी 187 जण पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. शहरातील पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ७२५ पर्यंत गेली  आहे. -जयराम लोहमटे, प्रशासक 
.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com