
सहकारनगर (पुणे) : तळजाई टेकडीवर हजारो नागरिक व्यायाम व फेरफटका मारण्यासाठी येत असतात. त्याचबरोबर काही नागरिक पाळीव कुत्री ही घेऊन फिरण्यास येत आहेत. वनक्षेत्रात कुत्री फिरावयास बंदी आहे, तरी सुद्धा नागरिक कुत्रे फिरावयास आणत असल्याने यामध्ये काही कुत्री ही जीवघेणा हल्ला करू शकतात, अशा जातीची ही कुत्री आहेत. एखाद्या नागरिकांच्या जीवावर बेतण्याअगोदर वनविभाग प्रशासनाने वेळीच अशा हौशी कुत्री प्रेमीवर अटकाव करून कठोर कारवाई करण्यात यावी, अशी नागरिक मागणी करीत आहेत.
राखीव वनक्षेत्रात नियमानुसार पाळीव व भटक्या कुत्र्यांना प्रवेश बंदी असताना ही काही हौशी नागरिक पाळीव कुत्र्यांना फिरण्यासाठी घेऊ येत असतात. काही वेळा ही कुत्री येथील मोर व ससे यांच्यावर ही हल्ला करतात. यामुळे येथील नैसर्गिक जैवविविधतेला धोकादायक ठरत आहे. यामुळे हौशी कुत्री पाळीव नागरिकांनी फिरण्यासाठी कुत्री घेऊन येऊ नये.
- लोकेश बापट, पर्यावरण प्रेमी
राखीव वनक्षेत्रात नियमानुसार पाळीव व भटक्या कुत्र्यांना प्रवेश बंदी आहे. तळजाई टेकडीवर पाळीव कुत्री फिरण्यास मनाई आहे. अशा प्रकारे फलक ही लावण्यात आले आहेत. मात्र काही नागरिकांना आमचे कर्मचारी वेळोवेळी सांगून सुद्धा कुत्री फिरवण्यास घेऊन येत असतील तर यापुढे अशा नागरिकांवर कारवाई केली जाईल.
- दीपक पवार, उपवनसंरक्षक, पाचगाव पर्वती पुणे
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.