चार महिन्यांपासून 'ती' भेटली नाही आपल्या तान्हुल्याला...

चार महिन्यांपासून 'ती' भेटली नाही आपल्या तान्हुल्याला...

चाकण : मूळची पोंदेवाडी,ता,आंबेगाव येथील रोषणा निवृत्ती वाळुंज-जठार ही ससून रुग्णालयात गेल्या चार महिन्यांपासून कोरोना रुग्णांवर उपचार करत आहे. स्टाफ नर्स म्हणून सेवा देत आहेत. रोषणा गेल्या चार महिन्यापासून तिच्या लहानग्या दोन वर्षांच्या बाळाला भेटली नाही.

20 मेच्या वाढदिवसाला तिच्या बाळाला तिने व्हाट्सऍपच्या कॉलवरही पाहिले नाही. बाळाचा फोनवर आवाज ऐकला आणि शुभेच्छा दिल्या. बाळाला माझी आई व्यवस्थित सांभाळत आहे. त्यामुळे मला रुग्णसेवा महत्वाची वाटते असे ती म्हणते.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

गेल्या सहा वर्षापासून ससून रुग्णालयात रोषणा स्टाफ नर्स म्हणून कार्यरत आहे. कोरोनाची साथ आल्यानंतर ती तिच्या बाळाला गेल्या चार महिन्यांपासून भेटली नाही. आठवण झाली तर बाळाला ती कधी व्हाट्सएप कॉलवर फोन करून बोलत होती व त्यात समाधान मानत होती. गावातल्या वस्तीवर कधी फोनला रेंज येते तर कधी रेंज येत नाही. त्यामुळे कधी बाळाला फोनवर पाहता येते तर कधी नाही. यापूर्वी तिने मुंबईच्या शासनाच्या गोकुळदास रुग्णालयात काम केले आहे. तिचे पती राज्य राखीव पोलिस दलात कार्यरत आहे.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

रोषणा सध्या पुणे येथे शासनाने सोय केलेल्या हॉस्टेलमध्ये राहत आहे. याबाबत रोषणा यांनी सांगितले की, मला प्रसिद्धीपेक्षा रुग्णांची सेवा महत्वाची वाटते. गेल्या चार महिन्यांपासून मी कोरोना रुग्णांसाठी सेवा देत आहे. रुग्णांची सेवा महत्वाची आहे. डॉक्टर व इतरांची रुग्णांसाठी सेवा खूप महत्त्वाची आहे. सर्वांच्या सहकार्याने कोरोना हद्दपार होणार आहे. रुग्णांची सेवा करत असताना बाळाची आठवण आली तरी ही आठवण बाजूला ठेऊन मला सेवा देण्यात समाधान वाटत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com