रोपांचे संवर्धन करा; दहा हजार मिळवा!

सचिन लोंढे ः सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 31 ऑगस्ट 2019

विद्यार्थ्यांना वृक्षसंवर्धनाची गोडी लागावी, यासाठी कळस (ता. इंदापूर) येथील हरणेश्‍वर विद्यालयात "रोप जगवा-रोख बक्षीस मिळवा' असा उपक्रम राबविण्यात येत आहे. विद्यार्थ्यांना प्रत्येकी एक आंब्याचे रोपटे वाटप करण्यात आले. उत्कृष्ट संगोपन झालेल्या प्रथम क्रमांकाच्या विद्यार्थ्यास दहा हजारांचे बक्षीस देण्यात येणार आहे. दुसऱ्या क्रमांकास तीन, तर तिसऱ्या क्रमांकाला दोन हजारांचे बक्षीस असणार आहे.

 

वृक्षसंवर्धनासाठी कळसच्या विद्यालयात उपक्रम; दहा हजारांपासून दोन हजारांपर्यंत रक्‍कम

 

कळस (पुणे) : विद्यार्थ्यांना वृक्षसंवर्धनाची गोडी लागावी, यासाठी कळस (ता. इंदापूर) येथील हरणेश्‍वर विद्यालयात "रोप जगवा-रोख बक्षीस मिळवा' असा उपक्रम राबविण्यात येत आहे. विद्यार्थ्यांना प्रत्येकी एक आंब्याचे रोपटे वाटप करण्यात आले. उत्कृष्ट संगोपन झालेल्या प्रथम क्रमांकाच्या विद्यार्थ्यास दहा हजारांचे बक्षीस देण्यात येणार आहे. दुसऱ्या क्रमांकास तीन, तर तिसऱ्या क्रमांकाला दोन हजारांचे बक्षीस असणार आहे.

दरम्यान, प्रथम क्रमांकाची बक्षीस रक्कम सरपंच गणेश सांगळे आणि प्रभारी गटविकास अधिकारी गुळवे हे प्रत्येकी पाच हजार या प्रमाणे दहा हजार रुपये देणार आहेत.

विद्यालयात जिल्हा परिषद सदस्य वैशाली पाटील, माजी सदस्य प्रतापराव पाटील, प्रभारी गटविकास अधिकारी व्ही.जे.गुळवे यांच्या हस्ते सॅनिटरी नॅपकिन वेडिंग मशिनचे उद्‌घाटन करण्यात आले. त्या वेळी हा उपक्रम जाहीर करण्यात आला.

या वेळी पोलिस पाटील तुकाराम खाडे, अंगणवाडी पर्यवेक्षिका एस. एस. नाटेकर, मुख्याध्यापक रामदास पवार, तानाजी सांगळे, विठ्ठल कांबळे, विलास खारतोडे, आशा सेविका व ग्रामस्थ उपस्थित होते.
विद्यालयात सॅनिटरी नॅपकिन डिस्पोजल मशिन बसविणे गरजेचे असल्याचे मत गटविकास अधिकारी गुळवे यांनी व्यक्त केले. याशिवाय वृक्षलागवडीबरोबरच त्याचे संगोपन महत्त्वाचे असल्याचे सांगितले.

प्रतापराव पाटील म्हणाले, ""लागवड केलेल्या झाडापासून फळ मिळेल, या हेतूने आंब्याची रोपे देण्यात आली आहेत. या झाडांचे संगोपन महत्त्वाचे असून सरपंच गणेश सांगळे व गटविकास अधिकारी गुळवे यांनी देऊ केलेले बक्षीस उल्लेखनीय आहे. वृक्षसंवर्धन काळाची गरज असून प्रत्येक विद्यार्थ्याने रोपटे जोपासावे. प्रत्येक शिक्षकाने वर्षातून एकदा किमान दोन रोपे लावून त्याचे संगोपन करावे.''  सुनील चांगण यांनी सूत्रसंचालन केले.

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Nurture the seedlings; Get ten thousand!