नायलॉनच्या मांजावर बंदी, तरीही नागरिकांच्या सुरक्षेवर दरवर्षी किंक्रांत

अजित घस्ते
Wednesday, 20 January 2021

दरवर्षी मांजामुळे अनेकांचे गळे कापले जात असल्याच्या घटना घडत आहेत. पद्मावती येथील महंमद शरीप सय्यद या तरूण युवकांचा गळा कापला असून चार बोटे तुटली आहेत त्याला अठरा टाके पडले आहेत.

सहकारनगर (पुणे) : नायलॉन मांजा विक्रीवर व वापरावर सरकारने बंदी घातलेली आहे, तरी ही दर वर्षी जानेवारी महिना सुरू झाला की बाजारपेठेत पतंगबरोबर घातक मांजाची विक्री केली जात असल्याने चित्र शहरात व उपनगरात दिसत आहे. मात्र या धोकादायक नायलॉनच्या मांजामुळे अनेकांचे गळे कापले गेले असल्याच्या घटना घडत असतात. अनेक वेळा वृत्तपत्रात बातम्या येऊन सुद्धा यावर प्रशासन कठोर कारवाई केली जात नाही असा आरोप नागरिक करीत आहेत.

यावेळी डॉ. नितीन बोरा म्हणाले, माणसांसह पक्षी आणि प्राण्यांनाही नायलॉन मांजाचा धोका पत्करावा लागत आहे. मांजा विक्रीकर बंदी असल्याने घातक मांजाचा वापर सर्रास पुणे शहर व उपनगरात केला जात असल्याचे चित्र अनेक वर्षापासून पाहायला मिळत आहे. दरवर्षी मांजामुळे अनेकांचे गळे कापले जात असल्याच्या घटना घडत आहेत. पद्मावती येथील महंमद शरीप सय्यद या तरूण युवकांचा गळा कापला असून चार बोटे तुटली आहेत त्याला अठरा टाके पडले आहेत.

यावेळी महंमदशरीफ सय्यद (वय 38 पद्मावती) म्हणाले, दुचाकी गाडीवरून तळजाई वसाहत वनशिव वस्तीकडून पद्मावतीकडे घरी जाताना सायंकाळी साडेसहा वाजता नायलॉनच्या मांजामुळे गळा कापला असून बोटे ही तुटली आहेत.वनशिव वस्तीमधील मुले पतंग उडवीत असतात मात्र यांना मांजा कोठून मिळतो याचा पोलिसांनी शोध घेऊन कठोर कारवाई केली पाहिजे. आज माझ्यावर संकट आले मात्र दुसऱ्यावर येऊ नये.तळजाई वसाहतकडून वनशिववस्ती वरून धनकवडी,आंबेगाव पठार याकडे जाणाऱ्या मार्गाचा अनेक नागरिक वापर करतात.

पोलिसांनी केवळ मांजा विक्रेत्यांवरवर कारवाई करून उपयोग नाही मांजाचे उत्पादन होणाऱ्या ठिकाणी छापे टाकावेत. मांजामुळे नागरिकांसह पक्षी प्राण्यांचे जीव गमवावा लागत आहे.शहरात व उपनगरात छोटी दुकाने स्टॉलवर मांजाची सर्रास विक्री सुरू असल्याने  विक्रेत्यांना पोलिस व महापालिकेच्या कारवाईची भीती नाही. यावर कारवाई कोण करणार ? महापालिका आणि पोलिस मात्र एकमेकांवर बोट दाखवत आपली जबाबदारी झटकत आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Nylon cat threatens the safety of citizens every year