Two Bikers Injured Due to Nylon Manja in Pune
Sakal
पुणे
Pune Nylon Manja : नॉयलॉन मांजाचा कहर: औंध-बाणेर व येरवड्यात दोन दुचाकीस्वार गंभीर जखमी!
Pune Nylon Manja Accident : नॉयलॉन मांजावर बंदी असूनही पुण्यात त्याचा वापर सुरूच असून दोन दुचाकीस्वार गंभीर जखमी झाले आहेत. नागरिकांनी प्रशासनाकडे कठोर व सातत्यपूर्ण कारवाईची मागणी केली आहे.
पुणे : औंध- बाणेर रस्त्यावर कामावरून दुचाकीवरून घरी जात असताना नॉयलॉन मांजा गळ्याला आणि हाताला लागून एक तरुण गंभीर जखमी झाल्याची घटना कस्तुरबा वसाहतीजवळ घडली. तसेच, येरवडा परिसरात अन्य एका घटनेत नायलॉन मांजामुळे आणखी एक तरुण गंभीर जखमी झाला. या घटनांमुळे शहरात बंदी असूनही नॉयलॉन मांजाची विक्री आणि वापर सर्रास सुरू असल्याचे पुन्हा एकदा समोर आले आहे.

