हेड फूट पाडणाऱ्यांना जनतेने नाकारले

हेड
फूट पाडणाऱ्यांना जनतेने नाकारले
Published on: 

शिकागो (इलिनॉइस), ता.४ (वृत्तसंस्था) ः अमेरिकेतील मध्यावधी निवडणुकीमध्ये डेमोक्रॅटिक पक्षाने बाजी मारल्यानंतर माजी अध्यक्ष बराक ओबामा यांनी पक्षाच्या कामगिरीचे मुक्तकंठाने कौतुक केले.‘‘ अमेरिकी जनतेने आता स्पष्ट संदेश दिला आहे, जनतेला एकत्र आणणारे राजकारण हवे आहे, त्यांना फूट पाडणारे लोक नकोत,’’ असे त्यांनी ‘एक्स’ या प्लॅटफॉर्मवर नोंदविलेल्या प्रतिक्रियेमध्ये म्हटले आहे.
ओबामा म्हणाले, की आपल्या समस्यांवर तोडगा काढू शकणाऱ्या नेत्यांनाच जनतेची पसंती असल्याचे दिसते. या निवडणुकीमध्ये प्रत्येक प्रांतामध्ये प्रभावी उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरल्यानेच अशा प्रकारचा निकाल हाती येऊ शकला. या प्रत्येक उमेदवाराची कौटुंबिक पार्श्वभूमी वेगळी असली तरी त्यांची मूल्ये मात्र समान आहेत. जनसेवेच्या भावनेवर त्यांचा विश्वास दिसतो. दोन्ही पक्षांचे निवडणूक अधिकारी आणि स्वयंसेवकांचे देखील मी आभार मानतो कारण त्यांच्यामुळेच ही निवडणूक चांगल्या पद्धतीने पार पडू शकली. या प्रशासनाकडे आणखी दोन वर्षे सत्तेची धुरा राहील, ज्या ठिकाणी आपल्या हातामध्ये बळ आहे तिथे आपण बदल घडवून आणला पाहिजे. येत्या काळामध्ये जे नुकसान होऊ घातले आहे ते टाळायला हवे. भविष्यासाठी आपल्याला जमिनीवर उतरून काम करावे लागेल.

अध्यक्षपदासाठीचा कौल नाही
या निवडणुकीतील दारुण पराभवानंतर ट्रम्प यांनी हा अध्यक्षपदासाठीचा कौल नसल्याचा दावा केला. ‘‘ मागील दोन वर्षांमध्ये अर्थव्यवस्थेच्या आघाडीवर आम्हाला चांगले काम करता आले,’’ असा दावा त्यांनी केला. या विजयाबद्दल डेमोक्रॅटिक पक्षाच्या सदस्यांचे अभिनंदन करताना त्यांनी रिपब्लिकन पक्षाच्या उमेदवारांना मतदारांवर प्रभाव टाकण्यात अपयश आल्याचे नमूद केले.

फॉक्स न्यूज म्हणते
‘‘तरुण, स्वतंत्र वृत्तीची मंडळी, ग्रामीण जनता आणि हिस्पॅनिक वंशाचे नागरिक हे रिपब्लिकन पक्षाच्याविरोधात गेल्याने सगळे चित्रच बदलले आहे. इराण युद्धातील नाचक्की, मनमानीपणे लादण्यात आलेले आयातशुल्क यामुळे लोकांमध्ये मोठा असंतोष निर्माण झाला होता,’’ असे ‘फॉक्स न्यूज’ या आघाडीच्या वृत्तवाहिनीने केलेल्या विश्लेषणात म्हटले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.