Fund Discrimination : ‘सारथी’ला भरपूर निधी; ‘महाज्‍योती’वर अन्‍याय, लक्ष्‍मण हाके, मंगेश ससाणे यांचा आरोप

Social Justice : महाज्योती व इतर मागासवर्गीय महामंडळांना अन्यायकारक निधीवाटपाचा आरोप करत ओबीसी नेत्यांनी अर्थमंत्र्यांना इशारा दिला, १५०० कोटी निधी न दिल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा.
Fund Discrimination
Fund DiscriminationSakal
Updated on

पुणे : बहुजन घटकांतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक व व्यावसायिक संधी उपलब्ध करून देण्‍यासाठी असलेल्‍या ‘महाज्‍योती’ व इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळाला निधी वाटप करताना अर्थमंत्री अजित पवार दुजाभाव करत आहेत. ओबीसींच्‍या तुलनेत कमी असलेल्‍या मराठा व कुणबी विद्यार्थ्यांसाठी असलेल्‍या ‘सारथी’ व ‘अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ’ यांना मात्र भरभरून निधी दिला जात आहे. येत्‍या काळात ‘महाज्‍योती’ व ‘मागासवर्गीय वित्त मंडळा’ला दीड हजार कोटी रुपये न दिल्‍यास आंदोलन करण्‍याचा इशारा ओबीसी नेते लक्ष्‍मण हाके व मंगेश ससाणे यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत दिला.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com