राज्यातील ओबीसी आरक्षण धोक्यात : अर्जुन सलगर

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 24 सप्टेंबर 2019

'राज्य सरकारने शासन आदेश काढून राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थेमधील ओबीसी आरक्षण कमी केले आहे. ओबीसी आरक्षणावर राज्य सरकार सातत्याने छेडछाड करत असून, आज राज्यातील ओबीसी आरक्षण धोक्यात आहे, अशी भीती वंचित बहूजन आघाडीच्या देखरेख समितीचे प्रदेश प्रमुख अर्जुन सलगर यांनी मंगळवारी व्यक्त केली. 

पुणे :  ''राज्य सरकारने शासन आदेश काढून राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थेमधील ओबीसी आरक्षण कमी केले आहे. ओबीसी आरक्षणावर राज्य सरकार सातत्याने छेडछाड करत असून, आज राज्यातील ओबीसी आरक्षण धोक्यात आहे, अशी भीती वंचित बहूजन आघाडीच्या देखरेख समितीचे प्रदेश प्रमुख अर्जुन सलगर यांनी मंगळवारी व्यक्त केली. 

आघाडीच्या देखरेख समितीचा दौरा आयोजित करण्यात आला आहे. त्यानिमित्ताने पत्रकार संघात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. आघाडीचे शहर अध्यक्ष मूनवर कुरेशी, भारिपचे शहर अध्यक्ष अतुल बहूले, सदस्य दिपक मोरे यावेळी उपस्थित होते. 

सलगर म्हणाले, ''आघाडीत येत्या निवडणूकीत ५० टक्क्यांपेक्षा जास्त जागा ओबीसी समाजाला दिल्या जातील. धनगर समाज वंचित आघाडी सोबत आहे.''  


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: OBC reservation in danger in state Said Arjun Salgar