obc community agitation in baramati
sakal
बारामती - ‘ओबीसी समाजाच्या वाट्याचे आरक्षण कोणालाही घेऊ दिले जाणार नाही. या आरक्षणावर कोणालाही गदा आणू दिली जाणार नाही. ओबीसी समाजबांधव हा डाव कधीच यशस्वी होऊ देणार नाहीत,’ असा इशारा ओबीसी बांधवांनी बारामतीत शुक्रवारी दिला, तसेच मनोज जरांगे पाटील यांनी केलेल्या आक्षेपार्ह विधानाबद्दल त्यांच्यावर गुन्हा दाखल करून त्यांना अटक करावी, अशीही मागणी या मोर्चादरम्यान नेत्यांनी केली.