
पुणे - खराडी येथील ड्रग्ज पार्टी प्रकरणातील आरोपी प्रांजल खेवलकरच्या मोबाईलमधून आक्षेपार्ह अश्लील छायाचित्रे आणि व्हिडिओ सापडले आहेत. महिलांचे शोषण आणि मानवी तस्करीबाबत विशेष तपास पथकाकडून (एसआयटी) सखोल चौकशी करण्यात यावी, अशी मागणी पोलिस महासंचालक यांच्याकडे करण्यात आली आहे, अशी माहिती राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांनी गुरुवारी (ता. ७) पत्रकार परिषदेत केली.