मंचर नगरपंचायत प्रारूप मतदार यादीवर 812 नागरिकांच्या हरकती

प्रथमच होणाऱ्या निवडणुकीची जय्यत तयारी
municipal elections voter lists objections
municipal elections voter lists objectionsSakal

मंचर - मंचर नगरपंचायत (ता. आंबेगाव) प्रथमच होणाऱ्या निवडणुकीसाठी तयार केलेल्या १ ते १७ प्रभागातील प्रारूप मतदार यादीवर आक्षेप नोंदवण्यासाठी तब्बल ८१२ हरकती सोमवारी (ता. २७) दाखल झाल्या आहेत. काही इच्छुक उमेदवारांनी शेजारच्या प्रभागातील आपले नातेवाईक, कार्यकर्ते व मित्र यांची नावे आपल्या प्रभागात घेण्यासाठी हरकती दाखल केल्याची जोरदार चर्चा सुरू आहे.

मंचर नगरपंचायत प्रारूप मतदार यादी नुकतीच प्रसिद्ध झाली आहे. हरकती घेण्याची शेवटची मुदत संपली आहे. आपल्या सोयीनुसार प्रभागात मतदारांची नावे दिसत नाही. हे पाहून काही इच्छुकांचे धाबे दणाणले आहेत. २, १०, १२, ११, १४, १६ या प्रभागात हरकतींची संख्या अधिक आहे.

प्रथमच होणाऱ्या निवडणुकीची जय्यत तयारी शिवसेना, राष्ट्रवादी कॉंग्रेस, भारतीय जनता पक्ष, कॉंग्रेस या सर्वच पक्षातील नेते क कार्यकर्त्यांमध्ये सुरु आहे. त्यामुळे आपल्याला पसंती देणारे मतदार आपल्या प्रभागात असावेत. म्हणून इच्छुक उमेदवारांनी नियोजित मतदार यादीवर लक्ष केंद्रित केले आहे. मतदारांचे अर्ज व पुरावे गोळा करून आक्षेप नोंदविण्यासाठी कार्यकर्त्यांची लगबग सुरु आहे. त्यामुळे इच्छुक उमेदवारांकडून कार्यकर्त्यांची चांगली बडधास्त ठेवली जात आहे.

“मंचर नगरपंचायतीत तीन ते चार हजार मतदारांचा प्रभाग बदलण्याचा खटाटोप सुरु आहे. आलेल्या काही हरकती ह्या केवळ मत पेटी डोळ्यासमोर ठेऊन केल्या आहेत.प्रशासनाने पुरावे तपासून मतदार याद्या तयार कराव्यात. नियमबाह्य काम झाल्यास न्यायालयाचा दरवाजा ठोटावा लागेल.”

- दत्ता गांजाळे, माजी सरपंच मंचर.

“मंचर नगरपंचायतीत ८१२ हरकती प्राप्त झाल्या आहेत.आवश्यक ते पुरावे तपासून योग्य निर्णय घेतला जाईल.”

- मनोज पष्ठे, मुख्य अधिकारी नगरपंचायत मंचर.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com