
PMRDA च्या विकास आराखड्यावर हरकतींचा पाऊस
वाघोली : पीएमआरडीएने तयार केलेल्या प्रारूप विकास आराखडयावर पूर्व हवेलीतून हरकतीचा पाऊस पडू लागला आहे. वाघोली कार्यालयात सोमवारपर्यंत 700 पेक्षा अधिक हरकती दाखल झाल्या आहे. हरकतीची मुदत 30 ऑगस्ट पर्यंत आहे. प्रत्येक गावाच्या विकास आराखड्यात जे झोन, रस्ते, आरक्षणे टाकण्यात आली आहे. ती चुकीचे असल्याचे शेतकऱ्यांचे व जागाममालकांचे म्हणणे आहे. कोणाच्या शेताततून पूर्ण रस्ता गेला आहे. तर कोणाच्या जागेत आरक्षण टाकण्यात आले आहे. (Pune News)
रस्ते टाका मात्र ते बांधावरून टाकले असते तर जमिनीचा काही भाग त्यासाठी गेला असता. मात्र काहींच्या शेतातूनच पूर्ण रस्ते टाकण्यात आले आहे. गरज नसलेले अनेक आरक्षणे टाकण्यात आली आहेत. जे झोन केले आहे. ते चुकीचे आहेत. असे म्हणत शेतकऱ्यांनी आपल्या हरकती नोंदविल्या आहेत. सध्या पी एम आर डी ए च्या वाघोली कार्यालयात हरकती नोंदविण्यासाठी गर्दी होऊ लागली आहे. काही ग्रामपंचायती ठराव करून सामूहिक हरकती नोंदवत आहेत.
खाण मालकांनी नोंदविल्या हरकती
वाघोलीत 2010 मधेच खाणी बंद झाल्या. मात्र तरी तो परिसर खाण झोन करण्यात आला आहे. या झोन वर खाण मालकांनी हरकती नोंदविल्या. सुमारे 250 हरकती नोंदविल्या. तो झोन रद्द करावा अशी मालकांची मागणी आहे.
हेही वाचा: Afghanistan Crisis : संघर्षांच्या चक्रव्यूहात अफगाणिस्तान
शेतकरी, तलाठी, ग्रामसेवक, मंडल अधिकारी यांचे कोणाचेच मत आरखडा तयार करताना घेतलेले दिसत नाही. केवळ बिल्डर धार्जीन आराखडा आहे. ओढे नाले चुकीच्या ठिकाणी दाखविण्यात आले आहे. आरक्षणेही चुकीची टाकण्यात आली आहे. या चुकीच्या धोरणामुळे शेतकरी भूमिहीन होत आहे.
-रामदास दाभाडे, माजी जिल्हा परिषद सदस्य
अधिकाऱ्यांनी वातानुकूलित कार्यालयात बसून हा विकास आराखडा बनविला आहे. जो पूर्ण पणे चुकीचा आहे. शेतकरी हरकती नोंदवित आहेत. त्या हरकतीनुसार त्यात बदल करावा. अन्यथा आम्ही या विरोधात रस्त्यावर उतरू.
-राजेंद्र पायगुडे, माजी हवेली तालुका प्रमुख, शिवसेना
आमच्या जमिनीतून तीन रस्ते तर टाकलेच शिवाय खेळाच्या मैदानासाठीही जागा आरक्षित केली. हा आमच्यावर अन्याय नाही का? यामुळे आम्ही भूमिहीन होऊ.
-पांडुरंग सातव, शेतकरी
Web Title: Objections On Pmrdas Development Plan
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..