

Pune Municipal Corporation
sakal
पुणे - पुणे महापालिकेच्या विकासकामांच्या निविदा प्रक्रियेला होणाऱ्या विलंबाची प्रशासनाने गंभीर दखल घेतली आहे. निविदा प्रक्रिया विहित मुदतीत पूर्ण न केल्यास संबंधित खातेप्रमुख आणि उपआयुक्तांची जबाबदारी निश्चित करून प्रथम दंडात्मक, त्यानंतर शिस्तभंगाची कारवाई करण्याचा इशारा प्रशासनाने दिला आहे. ‘अ’ पाकीट उघडल्यानंतर कमाल १५ दिवसांत तांत्रिक छाननी करून ठेकेदार पात्र किंवा अपात्र ठरविण्याचे आदेश देण्यात आले आहेत. यासंदर्भात ‘सकाळ’ने वृत्त देऊन ब पाकीट न उघडता कामे अडवून ठेवल्याचे वृत्त प्रकाशित केले होते.