

Pune Fraud
Sakal
पुणे - आपल्या दोन मुलींच्या उपचारासाठी इंग्लंडहून भारतात परतलेल्या दांपत्याला भोंदूबाबासह एका महिलेने अंधश्रद्धेच्या जाळ्यात ओढत तब्बल १४ कोटी रुपयांची फसवणूक केली आहे. मुलींना आजारातून बरे करण्याच्या बहाण्याने कोथरूडमधील या कथित मांत्रिक महिलेने डोळस दांपत्याला इंग्लंडमधील घरासह सर्व संपत्ती विकण्यास भाग पाडल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.