जिल्ह्यात ८१४ गावांची ओडीएफ प्लस पडताळणी पूर्ण

जिल्ह्यात ८१४ गावांची ओडीएफ प्लस पडताळणी पूर्ण
Published on

जिल्ह्यात ८१४ गावांची ओडीएफ प्लस पडताळणी पूर्ण
निकष पूर्ण करूनही १२४ गावांना दर्जा प्राप्त होण्याची प्रतीक्षा

सकाळ वृत्तसेवा
सोलापूर, ता. ८ : जिल्ह्यात हागणदारीमुक्त अधिक (ओडीएफ प्लस) मॉडेल गावांची पडताळणी करण्याची प्रक्रिया सुरू असून, उपलब्ध आकडेवारीनुसार जिल्ह्यातील ११०० गावांपैकी ८१४ गावांची पडताळणी पूर्ण झाली आहे. तर १४९ गावांची मॉडेल श्रेणीसाठी पडताळणी होणार असल्याची माहिती प्रभारी उपमुख्य कार्यकारी अधिकारी अमोल जाधव यांनी दिली. या प्रक्रियेत गावांमध्ये घनकचरा व सांडपाणी व्यवस्थापन, स्वच्छता सुविधा, सार्वजनिक ठिकाणांची स्वच्छता आदी निकषांची पाहणी केली जात आहे. ११ तालुक्यांतील अशा १२४ गावांची यादी प्रशासनाकडून निश्चित करण्यात आली आहे. त्यामुळे निकष पूर्ण करूनही मॉडेल गावाचा दर्जा मिळण्यास विलंब होत आहे.
जिल्ह्यात ११०० ओडीएफ प्लस गावांची नोंद असून, त्यापैकी ८२७ गावांची पडताळणी झाल्याचे तक्त्यात नमूद आहे. त्यापैकी ८१४ गावांची मॉडेल श्रेणीतील पडताळणी पूर्ण झाली आहे. आणखी १३ गावांच्या पडताळणीची प्रक्रिया शिल्लक आहे. मॉडेल गावांच्या अंतिम पडताळणीत १४९ गावांची प्रक्रिया अद्याप पूर्ण झालेली नसल्याचेही आकडेवारीतून स्पष्ट होते. अक्कलकोट, बार्शी, करमाळा, माढा, माळशिरस, मंगळवेढा, मोहोळ, पंढरपूर, सांगोला, उत्तर सोलापूर आणि दक्षिण सोलापूर या तालुक्यांमध्ये ओडीएफ प्लस मॉडेल गावांच्या पडताळणीचे काम सुरू आहे. ग्रामपंचायतींनी आवश्यक निकष पूर्ण करून पडताळणी प्रक्रिया वेळेत पूर्ण करण्यावर भर दिला आहे.

१२४ गावे ‘ओडीएफ प्लस मॉडेल’पासून वंचित
अनेक गावांमध्ये सांडपाणी व घनकचरा व्यवस्थापनाची कामे पूर्ण झालेली असतानाही ती गावे हागणदारीमुक्त अधिक म्हणून अद्याप घोषित करण्यात आलेली नाहीत. जिल्ह्यातील ११ तालुक्यांतील अशा १२४ गावांची यादी प्रशासनाकडून निश्चित करण्यात आली आहे. त्यामुळे निकष पूर्ण करूनही मॉडेल गावाचा दर्जा मिळण्यास विलंब होत आहे. करमाळा तालुक्यात सर्वाधिक १८ गावे या यादीत आहेत. त्यापाठोपाठ मंगळवेढ्यात १५, माढ्यात १४, बार्शीत १२, मोहोळमध्ये १२, पंढरपूरमध्ये २१, दक्षिण सोलापुरात १२, अक्कलकोटमध्ये ८, माळशिरसमध्ये ६, उत्तर सोलापुरात ४ आणि सांगोल्यात २ गावांचा समावेश आहे.

पंढरपूरमध्ये सर्वाधिक गावे
कामे पूर्ण होऊनही ‘मॉडेल’ दर्जाच्या घोषणेच्या प्रतीक्षेत असलेल्या गावांची संख्या पंढरपूर तालुक्यात सर्वाधिक २१ आहे. करमाळ्यात १८, मंगळवेढ्यात १५ तर माढ्यात १४ गावे आहेत. संबंधित गावांची प्रत्यक्ष पडताळणी करून निकषांची पूर्तता झाल्याची खात्री केल्यानंतर ओडीएफ प्लस मॉडेल म्हणून घोषणा करण्याची प्रक्रिया वेगाने पूर्ण करण्याची गरज निर्माण झाली आहे. कामे पूर्ण असूनही केवळ घोषणेअभावी गावांना अपेक्षित दर्जा मिळत नसल्याने प्रशासनाने याकडे गांभीर्याने पाहण्याची आवश्यकता आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com