

Drainage Cleaning issue
Sakal
पुणे - नाले सफाई, पावसाळी गटारांची थातूरमातूर स्वच्छता होत असल्याने ठेकेदारांच्या कामाची पोलखोल झाली आहे. अजूनही अनेक ठिकाणी कामे व्यवस्थित होत नाहीत. पण याकडे शहरातील नगरसेवकांचे पूर्ण दुर्लक्ष होत आहे. पावसाळा तोंडावर आला तरीही अजूनही एकाही पदाधिकाऱ्याने नाले सफाईच्या कामाची पाहणी केलेली नाही. त्यामुळे पदाधिकारी एसीमध्ये अन् गाळ नाल्यांमध्ये अशी अवस्था झाली आहे.