Case Filed Against Company Manager for Harassment
Sakal
सुनील जगताप
उरुळी कांचन : धमकी देऊन अश्लील भाषेमध्ये शिवीगाळ करत विवाहित महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी एका कंपनीच्या व्यवस्थापकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार याप्रकरणी २९ वर्षे वयाच्या विवाहित पिडीतेने दिलेल्या फिर्यादीवरून एका कंपनीचे व्यवस्थापक परमेश्वर साहेबराव शिंदे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.