Pune News
Pune News

Pune News : पुण्यात अतिक्रमण विभागाच्या अधिकाऱ्याला अन् कर्मचाऱ्याला मारहाण!

Published on

पुण्यातील ढोले पाटील रोडवर अतिक्रमण विभागाच्या अधिकाऱ्याला आणि कर्मचाऱ्याला मारहाण करण्यात आल्याचा प्रकार घडला आहे. अनाधिकृत फेरीवाल्यांवर कारवाई करत असताना ही मारहाण करण्यात आली.

या मारहाणीत अतिक्रमण निरीक्षक आणि सुरक्षा कर्मचारी जखमी झाले आहेत. पुण्यातील ढोले पाटील रोडवर ही घटना घडली आहे. यावेळी लोक मोठ्या प्रमाणात जमले होते. (Pune Crime News)

क्षेत्रीय कार्यालयांच्या अंतर्गत अतिक्रमण काढण्यासाठी गेलेल्या कर्मचाऱ्याला मारहाण करण्यात आली. अनाधिकृत फेरीवाल्यांवर पुण्यात कारवाई सुरू आहे. ढोले रोडवरील कारवाई दरम्यान जमावाने कर्मचाऱ्याला मारहाण झाली.

Pune News
Pune News: पुण्याची वाहतूक कोंडी फुटणार! कात्रज कोंढवा रस्ता रुंद करणासाठी २०० कोटी मंजूर

पुण्यात अतिक्रमण विभागाची जोरदार कारवाई सुरू आहे. ढोले रोडवर कर्मचारी कारवाई करत होते. यावेळी फेरीवाले, छोटी दुकानवाले सुरक्षारक्षकावर धावून गेली. यावेळी धक्काबुक्की झाली. त्यानंतर मारहाण झाली. याप्रकरणी तक्रार दाखल करण्यात आली आहे.

Pune News
बिबट्याच्या हल्ल्यात आळेफाटा येथे कुत्रा ठार

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com