सासवड नगरपरिषदेच्या उपक्रमांचे उमरेडमधील अधिकाऱ्यांकडून कौतुक

सासवड नगरपरिषदेच्या उपक्रमांचे उमरेडमधील अधिकाऱ्यांकडून कौतुक

सासवड शहर, ता. १६ : नागपूर जिल्ह्यातील उमरेड नगरपालिकेतील अधिकाऱ्यांनी सासवड नगरपरिषदेने स्वच्छ सर्वेक्षण अंतर्गत केलेल्या नाविन्यपूर्ण उपक्रमाची पाहणी करून माहिती घेतली. उपक्रमांचे कौतुक केले.

नगरपालिकेचे उपमुख्याधिकारी रामदास कुलेवाड, पाणीपुरवठा व स्वच्छता अभियंता मयूरी पाटील, स्थापत्य अभियंता अक्षय झिरपे, विद्युत अभियंता राहुल मारवाडे, दिलीप चव्हाण, संगणक अभियंता कल्याणी येवले, लेखापाल स्वप्नील तुमडाम व शहर समन्वयक येरिका ताजने यांचा समावेश होता.
सासवडनगर परिषदेच्या वेस्ट वंडर पार्क, एमआरएफ सेंटर, वेट वेस्ट प्रोसेसिंग प्लांट, विविध नावीन्यपूर्ण उपक्रम, सोलर प्लांट इत्यादी विषयांचे पाहणी करून माहिती घेतली.

यावेळी सासवड नगर परिषदेचे मुख्याधिकारी डॉ. कैलास चव्हाण यांनी उमरेड नगरपालिकेतील अधिकाऱ्यांचे स्वागत करून स्वच्छ सर्वेक्षण अंतर्गत सासवड नगरपरिषदेने राबविलेल्या विविध उपक्रमांची माहिती देऊन मार्गदर्शन केले.
यावेळी सासवड नगर परिषदेचे नगर अभियंता जावेद मुल्ला, पाणीपुरवठा अभियंता संकेत नंदवंशी,आरोग्य विभाग प्रमुख मोहन चव्हाण, शहर समन्वयक राम कारंडे उपस्थित होते.

08751

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com