समाजकल्याण

समाजकल्याण
Published on

स्वनिधी व दिव्यांग योजनांसाठी ऑफलाइन अर्ज

सातारा, ता. १२ : जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण विभागात २०२६-२७ पासून स्वनिधी योजनेसाठी ऑनलाइन प्रक्रिया बंद करून ऑफलाइन अर्ज प्रक्रिया सुरू करण्यास मंजुरी देण्यात आली. दिव्यांग योजनांनाही ऑफलाइन अर्जाची सुविधा मिळणार आहे, तसेच जिल्हा परिषद सेस फंडातून जोडरस्त्याच्या निधीत वाढ करून दहा लाख, तर समाजमंदिरासाठी सात लाख रुपयांची तरतूद करण्यात आल्याची माहिती समाजकल्याण सभापती ऋषिकेश धायगुडे यांनी दिली.
जिल्हा परिषद समाजकल्याण समितीच्या विषय समिती बैठक आज झाली. या योजनेत विविध लोकहिताच्या योजनांबाबत महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. २०२५-२६ या वर्षात स्वनिधी योजनांसाठी ऑनलाइन अर्ज प्रक्रिया राबविण्यात आली होती. मात्र, ग्रामीण भागातील अनेक लाभार्थ्यांना तांत्रिक अडचणींचा सामना करावा लागत असल्याने २०२६-२७ पासून या योजनांसाठी ऑफलाइन अर्ज स्वीकारण्यास समितीने मंजुरी दिली आहे. याचबरोबर दिव्यांग योजनांसाठीही ऑफलाइन अर्ज प्रक्रिया सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे ग्रामीण व दुर्गम भागातील दिव्यांग लाभार्थ्यांना योजनांचा लाभ घेणे अधिक सुलभ होणार आहे.
बैठकीत जिल्हा परिषद सेस फंडातील तरतुदीतही वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला. सुरुवातीला जोडरस्त्यांसाठी पाच लाख निधी होता. यात वाढ करण्याचा निर्णय ठराव समितीत घेण्यात आला आहे, तसेच प्रशासकीय काळात गजनृत्य स्पर्धा घेण्यात आली होती. या योजनेलाही प्रोत्साहन देण्यासाठी निधीत वाढ करण्यात आल्याची माहिती श्री. धायगुडे यांनी दिली. या वेळी समाजकल्याण समितीचे सदस्य उपस्थित होते.

..............

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com