

तेलबिया आणि कडधान्य प्रक्रिया
उद्योगासाठी अनुदानाची संधी
ऑफलाइन अर्ज मागविले; प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य
ॲग्रोवन वृत्तसेवा
बुलडाणा : राष्ट्रीय खाद्यतेल अभियान-तेलबिया २०२६-२७ आणि कडधान्य आत्मनिर्भरता अभियान २०२६-२७ अंतर्गत तेलबिया व कडधान्य प्रक्रिया उद्योग उभारण्यासाठी शेतकरी, शेतकरी उत्पादक कंपन्या, सहकारी संस्था व उद्योजकांना अनुदान उपलब्ध करून देण्यात आले आहे. इच्छुकांनी आवश्यक कागदपत्रांसह तालुका कृषी अधिकारी कार्यालयात ऑफलाइन अर्ज सादर करावेत, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी संतोष डाबरे यांनी केले आहे.
राष्ट्रीय खाद्यतेल अभियानांतर्गत फिल्टर प्रेससह मिनी ऑइल मिल उभारण्यासाठी सर्वसाधारण प्रवर्गाला ४० टक्के, तर अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, अल्पभूधारक, सीमांत व महिला प्रवर्गाला ५० टक्के अनुदान मिळणार असून, कमाल मर्यादा ४ लाख रुपये आहे. फिल्टर प्रेसशिवाय मिनी ऑइल मिलसाठी ४० व ५० टक्के अनुदान असून, कमाल मर्यादा ३ लाख रुपये आहे.
१० टन क्षमतेच्या तेल काढणी युनिटसाठी प्रकल्प खर्चाच्या ३३ टक्के किंवा कमाल ९.९० लाख रुपये अनुदान मिळणार आहे. यासाठी एफपीओ, एफपीसी, सहकारी संस्था, उद्योग व इतर पात्र घटकांना बँक कर्ज मंजुरी आवश्यक आहे.
कडधान्य प्रक्रिया व पॅकेजिंग युनिटसाठी प्रकल्प खर्चाच्या ३३ टक्के किंवा कमाल २५ लाख रुपये आर्थिक साहाय्य दिले जाणार आहे. एफपीओ, क्लस्टर स्तरावरील महासंघ, प्राथमिक कृषी पतसंस्था आणि २१ वर्षे पूर्ण केलेले वैयक्तिक उद्योजक पात्र आहेत. युनिटची किमान क्षमता ताशी ३०० किलो असणे, तसेच एफएसएसएआय नोंदणी व पर्यावरणीय नियमांचे पालन बंधनकारक आहे. या योजनांचा लाभ ‘प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य’ तत्त्वावर देण्यात येणार आहे. त्यामुळे इच्छुकांनी तातडीने अर्ज सादर करावेत, असे आवाहन करण्यात आले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.