चैतन्य हास्य क्‍लबच्या वर्धापनदिनी साठ वर्षांपुढील 'तरुणीं'चा नृत्याविष्कार

चैतन्य हास्य क्‍लबच्या वर्धापनदिनी साठ वर्षांपुढील 'तरुणीं'चा नृत्याविष्कार

पुणे : लॉकडाउनमध्ये गाणे गात, ऑनलाईन व्याख्यान आयोजित करून संस्थेचा वर्धापनदिन साजरी केल्याचे तुम्ही पाहिले असेल. पण चैतन्य हास्य क्‍लबच्या शनिवारवाडा शाखेतील 60 वर्षांपुढील तरुणींनी चक्क नृत्याविष्कार सादर करत वर्धापन दिन साजरी केला आहे. 

क्‍लबच्या ज्योती दानवे, मीना कोष्टी, शामा भावसार, रोहिणी काळोखे, नीलिमा नलगे, सुनंदा परदेशी आदींनी ठसकेबाज लावण्यांवर आणि गाण्यांवर सादरीकरण केले आहे. विशेष म्हणजे सादरीकरणाचा व्हिडिओही यांनी तयार केला आहे.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

क्‍लबच्या सदस्या कोष्टी म्हणाल्या,"लॉकडाउनमुळे मंडळाचा वर्धापन दिन सुना-सुना जाणार हे मनाला काही पटत नव्हते. म्हणून दोन मिनिटे नृत्याचे सादरीकरण करण्याची संकल्पना वर्धापन दिनाच्या दोन दिवस आधी आम्हाला सुचली. त्यासाठी प्रत्येक सदस्याने घरी तयारी केली. घरात राहून चित्रित केलेला हा व्हिडीओ नक्कीच सर्वांना आवडेल.'' वयाने ज्येष्ठ असलेल्या या तरुणींचा हा व्हिडिओ सर्वांसाठीच प्रेरणादायी आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com