

ऑलिव्ह ऑइलच्या नावाखाली शेंगदाणा तेलाची विक्री
मुंबई, ता. २१ : सणासुदीच्या काळात भेसळ आणि निकृष्ट अन्नपदार्थांविरोधात अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) राज्यभरात धडक कारवाई केली. या मोहिमेत सुमारे ३.११ कोटी रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. यामध्ये ३२,०६१ लिटर खाद्यतेल आणि ३७,१२८ किलो इतर अन्नपदार्थांचा समावेश आहे. मुंबईतील चार अन्न आस्थापनांचे परवानेही निलंबित करण्यात आले. भिवंडीतील मे. विराज एन्टरप्रायजेसमधून ११,७७९ लिटर खाद्यतेल आणि २,८५० किलो चहा असा १.२७ कोटी रुपयांचा साठा जप्त झाला. जिवो ब्रँडचे पोमेस ऑलिव्ह ऑइल प्रत्यक्षात शेंगदाणा तेल असल्याचे प्रयोगशाळा तपासणीत उघड झाले.
छत्रपती संभाजीनगर विभागात परभणीतील तीन आस्थापनांतून ९,३१६ किलो खाद्यतेल आणि मोती नमकीनमधून २२,५५० किलो शेव-फरसाण मिश्रण जप्त करण्यात आले. या साठ्याची एकूण किंमत ८१.७१ लाख रुपये आहे. धाराशिवमध्ये खवा, पेढे आणि कलाकंद जप्त करण्यात आले. वैजापूरमधून ३४३ किलो तूप, तर सिल्लोडमधून १,०१३ किलो बेकरी पदार्थ जप्त झाले. नागपूर विभागात १,०७८.४० लिटर सोयाबीन तेल आणि ४९ किलो खवा जप्त झाला. पुणे विभागात नऊ हजार किलो पनीर, ४४० किलो खवा, ७७.७५ किलो इतर अन्नपदार्थ आणि ९,८८८ लिटर खाद्यतेल जप्त करण्यात आले. अहिल्यानगरमधील श्रीगोंदा तालुक्यातून ८७ किलो भगर जप्त केली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.