
पुणे : श्री संत ज्ञानेश्वर महाराज आणि श्री संत तुकाराम महाराज यांच्या पालख्या २१ जून रोजी पुण्यात मुक्कामी आहेत. याच दिवशी जागतिक योग दिन साजरा केला जाणार आहे. त्यामुळे राज्य सरकारच्या पुढाकाराने पुण्यात ‘वारकरी भक्तियोग उपक्रम’ आयोजित करण्यात आला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत लाखो वारकरी, विद्यार्थी, सामाजिक, राजकीय क्षेत्रातील नागरिक योगासने करणार आहेत. या उपक्रमात सुमारे १० लाख जण सहभागी होतील, अशी माहिती सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुरेश गोसावी आणि विद्यापीठाच्या सल्लागार समितीचे सदस्य राजेश पांडे यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत दिली.