राहू - राहू (ता. दौंड) येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात कार्यरत असलेल्या आरोग्यसेविका उषा सावके यांनी ‘रुग्णसेवा हीच ईश्वरसेवा’ या उक्तीला जागत आपले कर्तव्य पार पाडले आहे. त्यांनी गरोदर महिलेच्या प्रसूतीत असलेले संभाव्य धोके लक्षात घेत सुट्टीवर असतानाही सुखरूप प्रसूती पार पाडली आहे.