Maharashtra Budget: बजेटच्या आदल्या दिवशी पुणेकर भाजप नेते उपमुख्यमंत्र्यांच्या भेटीला, या आहेत मागण्या

पुणेकरांना स्वतः च्या मालकीच्या घराच्या घरपट्टीमध्ये 40 टक्के सवलत रद्द
Maharashtra Budget
Maharashtra BudgetEsakal

पुणे महापालिका हद्दीत मिळकत करात पुणेकरांना देण्यात येणारी ४० टक्के सवलत कायम ठेवावी अशी मागणी करण्यासाठी भाजपचे शिष्टमंडळ मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांना भेटलं आहे. पुण्याचे माजी महापौर मुरलीधर मोहोळ पालकमंत्री चंद्रकांत पाटील, आमदार माधुरी मिसाळ आणि आमदार सिद्धार्थ शिरोळे यांनी आज मुंबईत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आहे

मिळकत करातील ४० टक्के सवलत १/८/२०१९ पासून स्व:वापर करीत असलेल्या निवासी मिळकतीची काढण्यात येऊ नये आणि देखभाल दुरुस्ती खर्च १/४/२०१० पासून १५ टक्के हून १० टक्के फरकाची रक्कम मिळकतींकडून वसूल करण्यात येऊ नये, अशा प्रमुख मागण्या यावेळी भाजपच्या शिष्टमंडळाने उपमुख्यमंत्र्यांकडे केल्या आहेत.

पुण्यातील नागरिकांना 1970 सालापासून स्वतः च्या मालकीच्या घरात राहात असल्यास घरपट्टीमध्ये 40 टक्के सवलत मिळत होती. 2011 मध्ये महालेखा परिक्षकांनी याबाबत नोंदवला होता. पुणे महापालिकेच्या गेल्या 30 वर्षांपासून असलेल्या अनेक निर्णयांबाबतही आक्षेप नोंदवला होता. याचाच आधार घेऊन 2018 मध्ये तुमचे सरकार असताना व तत्कालीन मुख्यमंत्र्याच्याकडे नगर विकास खाते असताना एक अध्यादेश काढण्यात आला.

Maharashtra Budget
Pune News : काँग्रेस पदाधिकाऱ्याचे चंद्रकांत पाटीलांना पत्र म्हणाले, 'दादा पुणेकरांना वाचवा..'

या अध्यादेशानुसार 1900 सालापासून पुणेकरांना मिळणारी घरपट्टीतील सवलत रद्द करण्या आली आहे. केवळ सवलतच रद्द केली नाही तर 1300 सालापासून सन 2018 पर्यंत मिळालेली सवलत व्याजासहित पुणेकरांकडून वसूल करा असा स्पष्ट आदेश देण्यात आला आहे. त्यामुळे आपण वारंवार आश्वासन देऊन ही आता पुणेकरांना नोटीस येऊ लागल्या आहेत.

याबाबत पुण्यातील काँग्रेस प्रदेश सरचिटणीस संजय बालगुडे यांनी भाजप नेते आणि पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांना पत्रही लिहालं होतं. पुणेकरांना स्वतः च्या मालकीच्या घराच्या घरपट्टीमध्ये 40 टक्के सवलत मिळत होती. ही सवलत आता रद्द करण्यात आल्याच्या पुणेकरांना नोटीसा आल्या आहेत. तर 40 टक्के सवलत पुणेकरांना मिळाली पाहिजे असं संजय बालगुडे यांनी आपल्या पत्रात म्हंटलं आहे.

Maharashtra Budget
Khushboo Sundar: मी जे बोलले त्याची लाज वाटली नाही...वडिलांच्या गैरवर्तनावर खुशबू सुंदर पुन्हा बोलल्या

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com