ओणमनिमित्त बळीराजाचे सावलीनाट्यातून स्मरण

ओणमनिमित्त बळीराजाचे सावलीनाट्यातून स्मरण
Published on

तिरुअनंतपुरम, ता.२५ (पीटीआय) ः केरळमध्ये वार्षिक ओणम उत्सवाची लगबग सुरू झाली आहे. या उत्सवात बळीराजाचे स्मरण केले जाते. त्याची कथा यंदा सावल्यांचा खेळ, तेलाचे दिवे, चामड्याच्या बाहुल्या आणि संगीताच्या सुरांतून पुन्हा जिवंत होणार आहे.
ओणमच्या आदल्या दिवसापासून म्हणजे आजपासून तिरुअनंतपुरम येथील ‘निशागंधी’ या खुल्या रंगमंचावर आठवडाभर ‘महाबली चरितम्’ या पारंपरिक ‘थोल्पावकुथू’ (चामड्याच्या बाहुल्यांचे सावलीनाट्य) सादरीकरण सुरू झाले आहे. पद्मश्री सन्मानाने गौरविलेले थोल्पावकुथूचे ज्येष्ठ कलाकार रामचंद्र पुलवर यांच्या नेतृत्वाखाली आठ कलाकार या सादरीकरणात सहभागी होणार आहेत. पारंपरिक पद्धतीने तयार केलेल्या चामड्याच्या सुमारे ८० बाहुल्या, कथाकथन, संगीत, तालवाद्ये आणि तेलाच्या दिव्यांच्या मंद प्रकाशात बळीराजा, वामन आणि ओणमच्या कथेतील अन्य व्यक्तिरेखा यात साकारल्या जातात.

नबिदिनम मिरवणुकीचे स्वागत
नबिदिनम आणि ओणमच्या आदल्या दिवशीचा उथ्रादम एकाच दिवशी आल्याने केरळमध्ये आज धार्मिक सलोख्याचे दर्शन घडले. वेण्णक्करा येथे नबिदिनमची मिरवणूक सुरू असताना बळीराजाच्या वेशातील व्यक्तीने मुस्लिम नागरिकांशी हस्तांदोलन करून स्वागत केले आणि मिरवणुकीतील मुलांना खाऊचे वाटप केले. नबिदिनम अर्थात ईद-ए-मिलाद हा प्रेषित मोहम्मद यांच्या जयंतीनिमित्त साजरा केला जातो.

वानरांची पंगत
केरळातील दक्षिणेकडील कोल्लम जिल्ह्यातील सस्थामकोट्टा येथील श्री धर्म सस्था मंदिरात ओणमनिमित्त दरवर्षी मंदिर परिसरातील माकडांसाठी खास मेजवानी आयोजित केली जाते. भात-वरण, पापड, पचडी, अवियल, लोणचे आणि ओणममधील अन्य पारंपरिक पदार्थ माकडांना वाढले जातात. हे दृश्य अनोखे असले, तरी मंदिरातील अनेक भाविकांसाठी ते आता परिचयाचे झाले आहे. उथ्राडम आणि तिरुओणम या ओणमच्या दोन प्रमुख दिवशी माकडांसाठी ही खास मेजवानी दिली जाते, असे मंदिराशी संबंधित अभिजित एन. यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com